Upma Cutlet : आरोग्यासाठी पौष्टिक, नाश्त्याला घरीच बनवा उपम्याचे खमंग कटलेट, रेसिपीचा संपूर्ण Video
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
उपम्याला नव्या रूपात, चवदार आणि कुरकुरीत कटलेटमध्ये बदलता येते हे अनेकांना माहिती नसते. उरलेल्या अन्नाचा योग्य वापर करून चव आणि पोषणमूल्य कायम ठेवण्याचा हा उत्तम पर्याय आहे.
मुंबई : सकाळच्या धावपळीच्या जीवनात झटपट आणि पौष्टिक नाश्ता म्हणून उपमा अनेक घरांत आवडीने बनवला जातो. रव्याचा सुगंध, फोडणीचा खमंगपणा आणि भाज्यांची चव यामुळे उपमा हा प्रत्येक वयोगटाला आवडणारा पदार्थ ठरतो. मात्र, कधी कधी घरातला उपमा शिल्लक राहतो आणि तो दुसऱ्या दिवशी कोरडा होऊन राहतो. अशावेळी तो फेकून देण्याऐवजी त्याच उपम्याला नव्या रूपात, चवदार आणि कुरकुरीत कटलेटमध्ये बदलता येते हे अनेकांना माहिती नसते. उरलेल्या अन्नाचा योग्य वापर करून चव आणि पोषणमूल्य कायम ठेवण्याचा हा उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया शिल्लक उपम्याचे खमंग कटलेट कसे तयार करायचे.
उपम्याचे खमंग कटलेट साहित्य
2 वाट्या शिल्लक उपमा
1 उकडलेला बटाटा (कुस्करलेला)
2 टेबलस्पून तांदळाचे पीठ किंवा ब्रेडक्रम्स
शॅलो फ्राय करण्यासाठी तेल
उपम्याचे खमंग कटलेट कृती
एका भांड्यात शिल्लक उपमा घ्या. त्यात कुस्करलेला बटाटा मिसळा. संपूर्ण मिश्रण एकजीव करा. मिश्रण सैल वाटत असल्यास तांदळाचे पीठ किंवा ब्रेडक्रम्स घालून घट्ट करा. तयार मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे करून त्यांना कटलेटचा आकार द्या. तव्यावर थोडे तेल गरम करून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
advertisement
सर्व्हिंग टिप
गरमागरम कटलेट टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. अशा प्रकारे उरलेल्या उपम्याला नवा स्वाद देत घरातील अन्नाची नासाडीही टाळता येते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 4:46 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Upma Cutlet : आरोग्यासाठी पौष्टिक, नाश्त्याला घरीच बनवा उपम्याचे खमंग कटलेट, रेसिपीचा संपूर्ण Video









