advertisement

Sandane Recipe : ग्रामीण भागातील पारंपरिक पदार्थ, सोप्या पद्धतीने बनवा गोड सांदणे, रेसिपीचा Video

Last Updated:

मुख्य म्हणजे आजच्या तरुणाईमध्ये काहींना हा पदार्थ काय असतो हे सुद्धा माहीत नाही. आज आपण सांदणे कसे बनवतात, साहित्य आणि कृती बघणार आहोत.

+
सांदणे

सांदणे रेसिपी 

ठाणे : सांदणे ही खूप जुनी आणि पारंपरिक डिश आहे. पूर्वीच्या महिला ही सांदणे जास्तीत जास्त लग्नातच बनवत असायची. आता मात्र ग्रामीण भागात हे आवडते म्हणून कधीही बनवले जातात. मुख्य म्हणजे आजच्या तरुणाईमध्ये काहींना हा पदार्थ काय असतो हे सुद्धा माहीत नाही. आज आपण सांदणे कसे बनवतात, साहित्य आणि कृती बघणार आहोत. याची रेसिपी आपल्याला गृहिणी नम्रता देवकर यांनी सांगितली आहे.
सांदणे रेसीपी साहित्य 
सांदणे (गोड प्रकार)
मुख्य घटक: तांदळाचे पीठ/भिजवलेले तांदूळ (2 ते 3 तास /रात्रभर भिजवलेले तांदूळ )
ओले खोबरे, गूळ, वेलची पूड आणि चिमूटभर मीठ
आवश्यकतेनुसार बेकिंग पावडर
सांदणे कृती:
तांदूळ 3-4 तास भिजवून बारीक वाटून घ्या. तांदळाच्या पिठात नारळाचे दूध मिसळा. यात गूळ, वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घालून मिश्रण तयार करा. मिश्रण फार पातळ नसावे. एका डब्याला तूप लावून हे मिश्रण त्यात ओता. इडली पात्रात किंवा कढईत पाणी गरम करून वाफ येण्यासाठी ठेवा. सांदणाचे मिश्रण 15-20 मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या. थंड झाल्यावर वड्या पाडा आणि नारळाच्या रसासोबत किंवा तूप लावून खा.
advertisement
वैशिष्ट्ये:
फणसाचे सांदण: पिकलेल्या फणसाचे गरे वाटून त्यात तांदळाचे पीठ आणि गूळ घालूनही सांदण बनवले जाते.
आगरी पद्धत: यात तांदळाचे पीठ, ओले खोबरे, गूळ आणि वेलची वापरून वाफवले जाते.
हे नाश्त्यासाठी किंवा सणासुदीला / हळदी लग्नात बनवले जाते.
advertisement
हे दिसायला इडलीसारखे जाळीदार आणि मऊ असतात, जे सहसा केळीच्या पानावर किंवा स्टीलच्या डब्यात वाफवून तयार केले जातात. अशा प्रकारे सांदणे साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवले जातात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Sandane Recipe : ग्रामीण भागातील पारंपरिक पदार्थ, सोप्या पद्धतीने बनवा गोड सांदणे, रेसिपीचा Video
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement