उपम्याचे खमंग कटलेट साहित्य
2 वाट्या शिल्लक उपमा
1 उकडलेला बटाटा (कुस्करलेला)
2 टेबलस्पून तांदळाचे पीठ किंवा ब्रेडक्रम्स
शॅलो फ्राय करण्यासाठी तेल
Sandane Recipe : ग्रामीण भागातील पारंपरिक पदार्थ, सोप्या पद्धतीने बनवा गोड सांदणे, रेसिपीचा Video
उपम्याचे खमंग कटलेट कृती
एका भांड्यात शिल्लक उपमा घ्या. त्यात कुस्करलेला बटाटा मिसळा. संपूर्ण मिश्रण एकजीव करा. मिश्रण सैल वाटत असल्यास तांदळाचे पीठ किंवा ब्रेडक्रम्स घालून घट्ट करा. तयार मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे करून त्यांना कटलेटचा आकार द्या. तव्यावर थोडे तेल गरम करून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
advertisement
सर्व्हिंग टिप
गरमागरम कटलेट टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. अशा प्रकारे उरलेल्या उपम्याला नवा स्वाद देत घरातील अन्नाची नासाडीही टाळता येते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 4:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Upma Cutlet : आरोग्यासाठी पौष्टिक, नाश्त्याला घरीच बनवा उपम्याचे खमंग कटलेट, रेसिपीचा संपूर्ण Video





