Most Popular Vegetable : सगळ्यात प्रसिद्ध भाजी कोणती? गरिबाच्या ताटापासून ते फाईव स्टार किचनपर्यंत आहे तिला मागणी, सांगा नाव
- Published by:Devika Shinde
Last Updated:
श्रीमंतांच्या ताटात असो वा गरिबाच्या झोपडीत, खेड्यात असो वा शहरात, अगदी रशियाच्या थंडीपासून ते आफ्रिकेच्या वाळवंटापर्यंत सगळीकडे एकाच भाजीचा दरारा आहे.
जेवणात वेगवेगळी भाजी ही नक्कीच आपल्या ताटात असते, ज्यामध्ये कोबी, फ्लॉवर, मेथी, भोपळा, गवार, वांगं किंवा एखादी पालेभाजी... प्रत्येक वेळी वेगवेगळी भाजी आपण घेतो. पण या सगळ्यात एक भाजी अशी आहे जी घेतल्याशिवाय आपली बाजाराची फेरी पूर्णच होत नाही. श्रीमंतांच्या ताटात असो वा गरिबाच्या झोपडीत, खेड्यात असो वा शहरात, अगदी रशियाच्या थंडीपासून ते आफ्रिकेच्या वाळवंटापर्यंत सगळीकडे एकाच भाजीचा दरारा आहे. ती भाजी म्हणजे बटाटा.
advertisement
advertisement
बटाटा केवळ एक भाजी नसून ती ऊर्जेचा एक मोठा स्रोत आहे. स्वस्त, मस्त आणि सहज उपलब्ध होणारा बटाटा प्रत्येक देशाच्या चवीनुसार स्वतःला बदलतो. भारतात त्याचा 'समोसा' होतो, तर अमेरिकेत 'फ्रेंच फ्राईज'. रशियात त्याचे सूप बनवले जाते, तर ब्रिटनमध्ये तो 'मॅश्ड पोटॅटो'च्या रूपात खाल्ला जातो. या अष्टपैलू गुणामुळेच बटाटा जगातील सर्वाधिक खाल्ली जाणारी भाजी ठरली आहे.
advertisement
बटाट्याचा सर्वात जास्त शौकीन देश कोणता?तुम्हाला वाटत असेल की बटाटा सर्वात जास्त भारतात खाल्ला जातो, पण तसे नाहीये. जगात बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन आणि वापर करणारा देश चीन आहे. चिनी लोक मांसाहारासाठी ओळखले जात असले, तरी त्यांच्या रोजच्या जेवणात बटाट्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. चीननंतर भारत, रशिया आणि अमेरिका या देशांचा क्रमांक लागतो.
advertisement
संपूर्ण जगाचा विचार केला, तर दरवर्षी साधारणपणे 37 ते 38 कोटी टन बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतल्यामुळेच बटाट्याचे दर इतर भाज्यांच्या तुलनेत नियंत्रणात राहतात आणि तो प्रत्येकाला परवडतो.चीन: दरवर्षी सुमारे 9 ते 10 कोटी टन उत्पादन (जगात प्रथम).भारत: दरवर्षी सुमारे 5 ते 6 कोटी टन उत्पादन (जगात द्वितीय).
advertisement
भारतात बटाटा 'राजा' का मानला जातो?भारतात बटाट्याला 'भाज्यांचा राजा' म्हटले जाते, त्यामागे एक खास कारण आहे. बटाटा हा असा 'मैत्र' आहे जो कोणासोबतही सहज मिसळतो. फ्लॉवर-बटाटा, मटार-बटाटा, वांग-बटाटा किंवा अगदी टोमॅटो... बटाटा कोणत्याही भाजीची चव वाढवण्यासाठी सज्ज असतो. भारतीयांच्या नाश्त्यापासून (बटाटा पोहे, वडापाव) ते रात्रीच्या जेवणापर्यंत बटाटा राज्य करतो.
advertisement
लोकप्रियतेचे रहस्य: चव की आरोग्य?बटाटा लोकप्रिय होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची लागवड सोपी आहे आणि तो कमी वेळात तयार होतो. आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास, बटाट्यातून शरीराला भरपूर कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम मिळते. हे घटक शरीराला त्वरित ऊर्जा देतात, म्हणूनच कष्टाची कामे करणाऱ्या लोकांपासून ते खेळाडूंपर्यंत बटाटा सर्वांचा लाडका आहे.
advertisement






