advertisement

Ajit Pawar: जीवाभावाच्या मित्रासाठी 'नटसम्राट'ही रडला! मंचावर आला, हुंदका दाटला अन् 54 सेकंदात नानांनी मंच सोडला

Last Updated:

अजित पवार आणि नानांच्या घनिष्ट मैत्रीची पुन्हा एकदा प्रचिती आली. दादांच्या आठवणीत नाना पाटेकर भावूक झाले आणि मंच सोडला.

nana patekar
nana patekar
मुंबई :  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026 ला विमान अपघातात निधन झालं. अजित दादांचा झालेला मृत्यू अनेकांसाठी चटका लावणारा ठरला. महाराष्ट्रातील अजित पवार यांचे समर्थक, कार्यकर्ते शोकसागरात बुडाले आहेत. अजूनही अजितदादा आपल्यात नाहीत यावर त्यांचा विश्वास बसत नाहीये. अजितदादांची मराठी कलाकारांशीही चांगली मैत्री होती. त्यापैकीच एक म्हणजे नाना पाटेकर. आज पुन्हा एकदा दादा आणि नानांच्या घनिष्ट मैत्रीची पुन्हा एकदा प्रचिती आली. अजित दादांच्या आठवणीत नाना पाटेकर भावूक झाले आणि मंच सोडला.
मुंबईच्या वरळी डोममध्ये अजित पवारांच्या शोकसभेचं आयोजन केले होते. पवार कुटुंबातील सदस्यांसह राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच पक्षातील नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेकांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी नाना पाटेकर देखील मंचावर आले मात्र आपल्या मित्राला श्रद्धांजली देताना त्यांचा आवाज जड झाला, आठवणींने हुंदका दाटून आला एका मिनिटाताच नानांनी बोलता बोलता मंच सोडला. हा प्रसंग उपस्थित सर्वांना भावनिक करून गेला.
advertisement
काय म्हणाले नाना पाटेकर?
नाना पाटेकर म्हणाले, गेली 50 वर्षापासून माझा आणि दादाचे संबंध होता. दादा कार्यकर्ता होता तेव्हापासून आमची ओळख.... मी कधी बारामतीला गेलो की माझी सगळी उठबस दादा पाहायचा.... दादा 18-19 वर्षाचा होता मी त्यावेळी मी 25 आणि शरदराव 35 वर्षाचे होते. 50 वर्ष खूप होतात, माझ्याकडे अनेक आठवणी आहेत. फक्त आज मंडळी आज शोकसभेएवजी आपण दादांचा 75 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलो असतो तर आनंद वाटला असता.
advertisement
नाना आणि अजितदादांची खास मैत्री अनेकदा जाहीर व्यासपीठावर अजित पवार आणि नाना पाटेकर एकत्र दिसले आहेत. नानांनी अनेकदा अजित पवारांच्या मिश्किल स्वभावाचं कौतुक करुन त्यांचीही फिरकीही घेतली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर नानांचा लेक मल्हार पाटेकरने अजितदादा आणि नानांचे खास फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहिल्यानंतर अजितदादा आणि नानांची घनिष्ट मैत्री पाहायला मिळाली.
advertisement

अजितदादांच्या आठवणींनी सभागृह भावूक

अजित पवारांच्या निधनानंतर होणाऱ्या अधिवेशनात पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी अजितदादांच्या आठवणींनी संपूर्ण सभागृह भावूक झालं होतं. अजित दादांच्या आठवणी सांगताना सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले होते. नेहमीच वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा, कडक शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांची एक वेगळी आणि हळवी बाजूही सगळ्यांसमोर आली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar: जीवाभावाच्या मित्रासाठी 'नटसम्राट'ही रडला! मंचावर आला, हुंदका दाटला अन् 54 सेकंदात नानांनी मंच सोडला
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement