लाडक्या काकाच्या आठवणीत 'या' 3 गोष्टी कायमच्या सोडल्या,दादांच्या निधनानंतर रोहित पवारांचा मोठा निर्णय
- Published by:Prachi Amale
Last Updated:
दरम्यान आज विधानसभेत अजित पवारांविषयी बोलताना पहिल्यांदाच रोहित पवारांन भावना अनावर झाल्या.
पुणे : रोहित पवार आणि अजित पवार यांच्यातील नाते तसे एकदम खास. रोहित पवार हे भविष्यातील भारदस्त नेते होण्याची ताकद ठेवतात हे अजित पवार यांनी ओळखले होते. त्यामुळेच जिथे चुकेल तिथे काका म्हणून अधिकारवाणीने ते रोहित पवार यांना रागवत असत. रोहित पवार यांनीही काकांचे बोलणे मनाला लावून घेतले नाही. काही वर्षे राजकारणातील वाटा जरी वेगळ्या झाल्या तरी काका पुतण्याचे नाते त्यांनी प्रेमाने जपले. काका म्हणून रागावण्याचे ओरडण्याचे सगळे अधिकार रोहित पवार यांनी अजितदादांकडे जैसे थे ठेवले. एरवी राजकीय चूल वेगळी मांडल्यावर नात्यात दुरावा येतो. परंतु पवार घराण्यातील शिकवणीमुळे त्यांच्या नात्यात कधी अंतर पडले नाही. अजित पवारांना आदरांजली म्हणून रोहित पवारांनी त्यांना न आवडणाऱ्या तीन गोष्टी सुधारण्याचा निश्चय केल आहे.
अजित पवारांचा मृत्यू हा अपघात होता की घात यावरुन अनेक उलटसुलट दावे-प्रतिदावे केले जात आहेत. याचदरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही सलग पत्रकार परिषदांचा धडाका लावत गंभीर आरोप करतानाच अजितदादांचा अपघात नाही,तर घातच झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान आज विधानसभेत अजित पवारांविषयी बोलताना पहिल्यांदाच रोहित पवारांन भावना अनावर झाल्या.
रोहित पवारांच्या शारीरिक वजनावर काय म्हणायचे अजित पवार?
advertisement
अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना रोहित पवारांना अश्रू अनावर झाले. गेल्यावर्षीची अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आठवण सांगत अजित पवार यांचे माझ्यावर कसे लक्ष होते, हे सांगताना रोहित पवारांच्या अश्रूंचा बांध फुटला. रोहित पवार म्हणाले, आमच्या वयाच्या सर्व आमदारांवर अजितदादांचे विशेष लक्ष होते. अजित पवार कायम म्हणायचे रोहित तुझं सामाजिक वजन वाढलयं जरा शारीरिक वजन कमी कर आणि राजकीय वजन वाढव.... ते हयात असताना मी त्यांना फक्त हो म्हणायचो पण आज मी त्यांना शब्द देतो की, माझं शारीरिक वजन कमी करेल आणि राजकीय वजन वाढवेल...
advertisement
आदरांजली म्हणून रोहित पवारांनी केस कापले
रोहित पवार अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी गेल्यावर्षी विधानसभेत दाखल झाले होते. त्यावेळी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत मागून अजित पवार येत होते. त्यांनी रोहित पवारांना पाहताच "झिपऱ्या बऱ्याच वाढल्या तुझ्या", अशी मिश्किल टिप्पणी केली होती. या टिप्पणीवर रोहित पवारांनीही त्यांच्याकडे मागे वळत हसून पाहिलं. काका-पुतण्याच्या नात्यातील गंमतशीर पैलू पाहायला मिळाला होता. तो व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा गंमतीशीर प्रसंग कधी अतिशय भावनिक प्रसंगात वळेल असे कधी कोणाच्या ध्यानी मनी देखील नव्हता. आदरांजली म्हणून मी माझे केस कापले, माझा त्यांना शब्द आहे की मी माझी हेअर स्टाईल कायम तशीच ठेवेल असे रोहित पवार म्हणाले.
advertisement
शर्टाच्या बटणावर रोहित पवार काय म्हणाले?
पण एक वर्ष गोष्ट खरी आहे की ते कायम म्हणायचे शर्टाचे वरचे बटण लावत जा... काकांना मला फक्त एकच सांगायचे की ज्यावेळी 40-50 वर्षांनी मी तुम्हाला भेटेल तोपर्यंत बटण मी असचं उघडं ठेवणार.. ज्यावेळी मी तुम्हाला भेटेल ते बटण मी त्यावेळी लावेल कारण शेवटी बटण उघडे ठेवल्यानंतर तुमची आठवण त्या ठिकाणी येईल...
advertisement
अजितकाकांची ज्या वेळी भेट होईल.... नेमकं रोहित पवार काय म्हणाले?
अजितकाकांची माझी भेट होईल त्यावेळी थाट मानेने उभा राहील.. त्यावेळी काका माझ्या पाठीवर हात ठेवत म्हणतील लढलास बर का... हे शब्द ऐकण्यासाठी मी आणि सर्वांनी जो लढा उभारला आहे तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. दादांच्या अपघातात जो कोणी दोषी असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.. तो किती मोठा असला तरी आम्ही घाबरणार नाही, असेही रोहित पवार म्हणाले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 4:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लाडक्या काकाच्या आठवणीत 'या' 3 गोष्टी कायमच्या सोडल्या,दादांच्या निधनानंतर रोहित पवारांचा मोठा निर्णय








