ट्रेन समोर उभी होती अन् घात झाला, महिलेला गमवावा लागला हात, ठाणे रेल्वे स्थानकावरची मन सुन्न करणारी घटना
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Mohan Najan
Last Updated:
महिलेला गाडीखालून बाहेर काढण्यात आले असता तिचा उजवा हात खांद्यापासून पूर्णपणे तुटून वेगळा झाल्याचे आढळले. तसेच उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
ठाणे : रेल्वे स्थानकावर आज 23 फेब्रुवारी दुपारी 1:22 ला भीषण अपघात घडला. स्टेशन मास्टर यांनी अनाऊन्समेंट करून माहिती दिली की प्लॅटफॉर्म क्रमांक 07 वर आलेल्या महानगरी एक्सप्रेसच्या S-5 व S-6 कोचच्या खाली रेल्वेत चढताना एक महिला पाय घसरून पडली. तात्काळ पोलिस आणि हमाल घटनास्थळी पोहोचले. महिलेला गाडीखालून बाहेर काढण्यात आले असता तिचा उजवा हात खांद्यापासून पूर्णपणे तुटून वेगळा झाल्याचे आढळले. तसेच उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
जखमी महिलेने आपले नाव सीमा शब्बीर शेख (वय 28 वर्षे, रा. शांतिनगर, मोफतलाल उपनी सुभीता चाळ, रोटीमंगर, कछवामो) असे आहे. अपघाताच्या वेळी महिला पूर्ण शुद्धीवर होती. स्टेशन मास्टर यांचा मेमो घेऊन दोन हमालांच्या मदतीने जखमी महिलेला रुग्णवाहिकेतून छत्रपती शिवाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे अपघात विभागात ड्युटीवरील डॉ. दत्ता यांनी तत्काळ उपचार सुरू केले.
advertisement
तिच्या मोबाईलवरून वडिलांना संपर्क करून संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली. डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले की महिलेचा हात पूर्णपणे वेगळा झाल्याने आणि येथे शल्यचिकित्सक उपलब्ध नसल्यामुळे पुढील उपचारासाठी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे हलविणे आवश्यक आहे. त्यानुसार महिलेच्या आई-वडिलांनी स्वतःच्या जबाबदारीवर तिला सायन रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले.
advertisement
दरम्यान, जखमी महिलेचा मोबाईल फोन तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आला असून ती उपचारादरम्यान शुद्धीवर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटने संदर्भात पुढील तपास ठाणे पोलिसांकडून सुरू आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 5:04 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
ट्रेन समोर उभी होती अन् घात झाला, महिलेला गमवावा लागला हात, ठाणे रेल्वे स्थानकावरची मन सुन्न करणारी घटना








