advertisement

Summer Recipe: ऊन तापलंय अन् थंड प्यायचंय? 5 मिनिटांत बनवा चिकू शेक, सोपी अन् हेल्दी रेसिपी Video

Last Updated:

Summer Recipe: सध्या बाजारात चिकू दाखल झाले असून चिकू शेक रेसिपी अगदी सोप्या पद्धतीनं 5 मिनिटांत तयार होते.

+
ऊन

ऊन तापलंय अन् थंड प्यायचंय? 5 मिनिटांत बनवा चिकू शेक, सोपी अन् हेल्दी रेसिपी Video

छत्रपती संभाजीनगर: उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असताना अनेकजण काहीतरी थंडगार पिण्यास प्राधान्य देतात. त्यासाठी लिंबू सरबत, नारळपाणी किंवा एखादा ज्यूस हा पर्याय असतो. परंतु, तुम्ही जर वेगळ्या पर्यायाचा विचार करत असाल तर चिकू शेक हा उत्तम पर्याय आहे. कारण सध्या बाजारात चिकू दाखल झाले असून ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीनं 5 मिनिटांत तयार होते. याच रेसिपीबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
चिकू शेकसाठी लागणारे साहित्य
साधारणपणे तीन ते चार किंवा गरजेनुसार चिकूचा पल्प काढून घ्यायचा. एक ग्लास दूध, थोडेसे ड्रायफ्रूट, चवीप्रमाणे साखर आणि व्हॅनिला फ्लेवर आईस्क्रीम एवढेच साहित्य चिकू शेकसाठी लागेल.
चिकू शेक करण्याची रेसिपी
सर्वप्रथम एका मिक्सरच्या जारमध्ये एक ग्लास दूध टाकून घ्यायचं. त्यानंतरच चिकूचा जो काढलेला पल्प आहे तो टाकून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे. चवीप्रमाणे साखर टाकायची. (जर चिकू गोड नसेल तर त्याला गोड चव यावी म्हणून साखर किंवा गूळ वापरावा) त्यात व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घ्यायचे. हे सर्व मिक्सरमधून एकदम बारीक आणि एकजीव करून घ्यायचं.
advertisement
अगदी 5 मिनिटांत चिकू शेक पिण्यासाठी तयार होतो. वरून तुम्ही गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट देखील वापरू शकता. तसेच आवश्यक असल्यास आईस्क्रीम देखील घेऊ शकता. सोपी आणि सगळ्यांना आवडणारी ही चिकू शेकची रेसिपी घरीच ट्राय करू शकता.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
Summer Recipe: ऊन तापलंय अन् थंड प्यायचंय? 5 मिनिटांत बनवा चिकू शेक, सोपी अन् हेल्दी रेसिपी Video
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement