तुझा रेट किती? लाइव्ह शोमध्ये अँकरचा प्रश्न, भडकली गायिकेला; चपलेनं मारलं, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
लाइव्ह शोमध्ये एका प्रसिद्ध गायिकेला अँकरने नको तो प्रश्न विचारला. भडकलेल्या गायिकेनं त्याला चपलेनं मारलं. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात एक प्रसिद्ध गायिका लाईव्ह शोमध्ये एका अँकरला बेदम चोप देताना दिसतेय. गायिकेनं थेट तिच्या पायातली चप्पल काढली आणि त्याला चांगलाच मारला. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झालाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गायिकेनं त्या अँकरला मारण्यामागचं कारण देखील धक्कादायक आहे. नेमकं काय झालं होतं पाहूयात.
आधी अनेकांना वाटलं की हा पब्लिसिटी स्टंट वाटला. पण हा व्हिडीओ खरा आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी गायिका ही निशा उपाध्याय आहे. अँकरने गायिका निशाला सगळ्यांसमोर असा प्रश्न विचारला की गायिका संतापली. गायिका निशा ही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या भोजपूरी गायिकांपैकी एक आहे. ती नेमकी किती फी घेते हे जाणून घेण्याची सर्वांची इच्छा होती. पण अँकरनं असा प्रश्न विचारला की गायिकेच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, लाईव्ह शोमध्ये अँकरने निशाला ‘तुझा रेट काय आहे?’ असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच निशा संतापाने भडकली. त्यानंतर काही लोक मध्ये पडून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण गायिकेचा राग शांत झाला नाही. ही इतकी भडकली की तिने अँकरला मारण्यासाठी पायातील चप्पल काढली. "हा माझा रेट सांगणार का?" असं म्हणत ती त्याला मारायला गेली. पण उपस्थित असलेल्या इतरांनी तिला आवरलं.
advertisement
एक भोजपुरी में कलाकार हैं महिला Nisha Upadhyay एंकर मुकेश राय को चप्पल से मारने लगी मंच पे pic.twitter.com/0pIhm0WnA7
— Amit Yadav (@AmitYadav123530) February 23, 2026
निशा उपाध्यायचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी तिला सपोर्ट केला. सोशल मीडियावर अँकरने गायिकेच्या केलेल्या वागणुकीला चुकीचं ठरवलं आहे. एका यूजरने लिहिलं, "गायिकेसोबत अशा प्रकारचं वर्तन चुकीचं आहे. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे." तर दुसऱ्याने लिहिलं, "धाडसी महिला, तू जे केलंस ते अगदी योग्य केलंस."
advertisement
कलाकारांबरोबर असं घडणं हे नवीन राहिलेलं नाही. याआधी देखील अनेक कलाकारांबरोबर फॅन्सने चुकीचे वर्तन केल्याच्या घटना घडल्या आहेत. इतकंच नाही तर अभिनेता आणि राजकारणी पवन सिंह याने एका शोमध्ये अभिनेत्रीच्या थेट कंबरेत हात घातला होता. त्याचा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल झाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 12:49 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
तुझा रेट किती? लाइव्ह शोमध्ये अँकरचा प्रश्न, भडकली गायिकेला; चपलेनं मारलं, VIDEO








