Pune News : पाईप लाईन दुरुस्तीसाठी आला अन् 7 कोटींचा चुना लावून गेला; पुण्यात नेमकं घडलं काय?
Last Updated:
Pune Shocking News : पाईप लाईन दुरुस्तीच्या नावाखाली पुण्यात जेष्ठ नागरिकासोबत एक भयंकर प्रकार घडलेला आहे. सध्या आरोपीविरोद्धात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरु आहे.
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून फसवणूकीसाठी आरोपी ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करत आहेत. ज्यामुळे त्यांचे कार्य साधत मोठी रक्कम त्यांच्या कडून हडपतात. सध्या अशाच एका मोठ्या गुन्ह्याची नोंद पुणे शहरातून समोर आलेली आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सांडपाणी वाहिनी दुरुस्तीच्या बहाण्याने फसवणूकीचा प्रकार घडलेल्या आहे, ज्यात एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 6 कोटी 70 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
घडलेल्या या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाणे यांनी एका कंत्राटदाराला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संदीप उर्फ सोनू उर्फ आदित्य चव्हाण उर्फ ठाकूर (वय 40) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा देहूरोड येथील असून सध्या कोथरूडमध्ये राहत होता. त्याच्यासह आणखी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लाखोंचा गंडा
नारायण पेठेत राहणाऱ्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने याबाबत तक्रार दिली आहे. आरोपीने स्वतःला पुणे महानगरपालिका येथे सांडपाणी वाहिन्यांची कंत्राटी कामे करणारा ठेकेदार असल्याचे सांगितले. घराजवळील सांडपाणी लाईनमध्ये झाडांची मुळे शिरल्यामुळे नवीन लाईन टाकावी लागेल असे कारण देत त्याने पैशांची मागणी केली.
पालिकेची परवानगी, चलन भरणे, यंत्रसामग्री खर्च, मुलाची शस्त्रक्रिया तसेच विविध खोट्या कारणांवरून आरोपीने दोन वर्षे संबंधित ज्येष्ठ नागरिकाला धमकावत पैसे उकळले. आरोपीच्या साथीदारांनीही फोन करून पैसे देण्यासाठी दबाव टाकला. या प्रकरणात मोठ्या टोळीचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 12:44 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पाईप लाईन दुरुस्तीसाठी आला अन् 7 कोटींचा चुना लावून गेला; पुण्यात नेमकं घडलं काय?








