advertisement

Kheer Recipe Video : खीर बनवण्याची वेगळी पद्धत, होते अधिक चविष्ट

Last Updated:

How To Make Kheer : खीर असो वा कोणताही गोड पदार्थ त्याला फोडणी देत नाही. त्यामुळे फोडणीची किंवा तडकेवाली खीर हे वाचूनच तुम्हाला अजब वाटलं असेल. पण ही रेसिपी खूप जबरदस्त आहे.

News18
News18
सामान्यपणे फोडणी म्हणजे तिखट पदार्थांसाठी. भाजी, वरण, आमटी याला फोडणी दिली जाते. तसं बहुतेक पदार्थांना आधी फोडणी देऊन मग तो पदार्थ बनवला जातो. तर डाळ तडका, खिचडी अशा काही पदार्थांना वरून फोडणी दिली जाते. पण तुम्ही कधी खिरीला फोडणी दिली आहे का? किंवा फोडणीची खीर किंवा तडकेवाली खीर बनवली आहे का?
फोडणी म्हटलं की तेल, मोहरी, जिरं, लसूण, मिरची कडीपत्ता असे पदार्थ येतात. आता खिरीत तर हे पदार्थ पडत नाहीत. मग खिरीला फोडणी कशी काय द्यायची, फोडणीची खीर कशी काय बनवायची असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. चला तर मग आता थेट रेसिपीच पाहुयात.
advertisement
गॅसवर कढई ठेवा, गरम झाली की त्यात चमचाभर तूप टाका. आता यात तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स हवेत ते बारीक तुकडे करून टाका. ड्रायफ्रुट्स तुपात चांगले परतून घ्या. नंतर यात भाजलेल्या शेवया टाकून थोड्या परता. आता वरून दूध ओता. आता हे दू उकळू द्या.
तोपर्यंत फोडणीचं भांडं घ्या. फोडणीचं भांडं नसेल तर तुम्ही जे कोणतं भांडं वरून फोडणी देण्यासाठी वापरत असाल ते घ्या. त्यात साखर घ्या आणि ही साखर वितळवून घ्या. मधे मधे ढवळत राहा म्हणजे ती तळाला चिकटणार नाही. साखरेला पाणी सुटत असल्याचं तुम्हाला दिसेल. काही वेळाने साखर पूर्णपणे वितळेल तिचा रंगही बदललेला दिसेल.
advertisement
आता ही वितळवलेली साखर शेवया टाकून उकळवत ठेवलेल्या दुधात हळूहळू ओतून ते दूध ढवळा. म्हणजेच आपल्याला खिरीला साखरेची फोडणी द्यायची आहे.
सामान्यपणे खीर बनवताना आपण त्यात साखर टाकतो. पण अशा पद्धतीने ती विरघळवून टाकली की त्याचं टेक्स्चर आणि चव दोन्ही छान होत असल्याचं या महिलेने सांगितलं आहे. 10 मिनिटं उकळवून घ्या. वरून तुम्ही वेलची पूड, जायफळ पावडर टाकून ढवळा. तयार आहे तुमची फोडणीची खीर.
advertisement
advertisement
तुम्हीही फोडणीची खीर नक्की ट्राय करा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Kheer Recipe Video : खीर बनवण्याची वेगळी पद्धत, होते अधिक चविष्ट
Next Article
advertisement
IND vs SA : 14 बॉलर,15-15 मिनिटांचे 3 सेशन,टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' आफ्रिकेच्या चिंधड्या उडवणार
14 बॉलर,15-15 मिनिटांचे 3 सेशन,टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' आफ्रिकेच्या चिंधड्या
  • टीम इंडियाचं सिक्रेस सेशन

  • भारताच ब्रम्हास्त्र आफ्रिकेला धुळ चारणार

  • आफ्रिकेच काही खरं नाही

View All
advertisement