advertisement

Tea Recipe Video : साखर नसेल तर गूळ, पण चहापावडर नसल्यास चहा कसा बनवायचा?

Last Updated:

How To Make Tea : चहा पावडरशिवाय चहा शक्यच नाही, असं तुम्ही म्हणाल. असा चहा कसा बनवता येईल असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण हे शक्य आहे.

News18
News18
चहाची तलब आली आहे, चहा बनवण्यासाठी गॅसवर भांडं ठेवलं, त्यात पाणी ओतलं, साखर टाकली आणि चहापावडरचा डबा उघडला... अरे, चहा पावडरच नाही आहे. चहा बनवायला घेतल्यावर चहा पावडर संपल्याचं समजलं, आता काय करायचं? चहा कसा बनवायचा? चहा पावडरशिवाय चहा बनवताच येणार नाही. असं तुम्हालाही वाटेल. पण तुम्हाला माहिती आहे का, चहा पावडरशिवायही चहा बनवता येतो.
चहा बनवायला काय काय लागतं... तर, पाणी, साखर, चहापावडर आणि हवं असेल तर दूध... बहुतेक लोक साखरेऐवजी गूळ वापरतात. म्हणजे साखर नसेल तेव्हा त्याला पर्याय म्हणून चहात गूळ टाकता येतो. पण चहापावडरला पर्याय काय आहे, चहापावडर नसेल तर चहा कसा बनवायचा? हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
चहा पावडरशिवाय चहा शक्यच नाही, असं तुम्ही म्हणाल. असा चहा कसा बनवता येईल असा प्रश्न तुम्हाला पडेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही या पद्धतीने कोरा किंवा काळा चहा आणि दुधाचा चहाही बनवता येतो. चला तर आता रेसिपीच पाहुयात.
काळा चहा
मिक्सरच्या भांड्यात वेलची, लवंग, काळी मिरी आणि चक्रीफूल याची पूड करून घ्या. आता पातेल्यात चहासाठी पाणी गरम करून त्यात ही पूड, किसलेलं आलं, तमालपत्र, तुळशीचं पान, किंचित मीठ आणि गूळ टाकून उकळी काढून घ्या. गूळ विरघळला की ग्लासमध्ये गाळून घ्या. हा काळा चहा तयार.
advertisement
दुधाचा चहा
पातेल्यात दूध गरम करा. त्यात तयार केलेली मसाल्याची पूड, किसलेलं आलं, तमालपत्र आणि साखर टाकून चांगलं उकळून घ्या. आता गाळून घ्या, हा दुधाचा चहा तयार.
advertisement
@maashreyacooking6344 युट्युब चॅनेलवर हा रेसिपी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
त्यामुळे आता अचानक चहापावडर संपला आणि पाहुणे आले किंवा चहा प्यायची तलब आली तरी नो टेन्शन. चहापावडरशिवाय तुम्ही अशा पद्धतीने चहा बनवू शकता. एकदा नक्की ट्राय करून पाहा आणि कसा झाला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Tea Recipe Video : साखर नसेल तर गूळ, पण चहापावडर नसल्यास चहा कसा बनवायचा?
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement