Taak Masala : एकदाच बनवून ठेवा 'हा' स्पेशल ताक मसाला! महिनाभर राहील फ्रेश आणि चवीला तर एक नंबर..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Special masala for buttermilk : ताक आपले पचन सुधारते आणि पोटातील चांगले जिवाणू वाढवते. आज आम्ही तुम्हाला ताकाच्या एका खास मसाल्याची रेसिपी सांगत आहोत. जो तुमच्या ताकाला अप्रतिम चव देतील.
मुंबई : आता उन्हाळ्याची हलकी चाहूल लागत आहे. आपल्याकडे उन्हाळा खरा होळीनंतर सुरु होत असला तरी आतापासूनच काही राज्यांमध्ये थोडी गर्मी जाणवत आहे. अशात ताक आणि थंड पेयांची चर्चा तर होणारच. पण इतर थंड पेयांपेक्षा ताक पिणं आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर असतं. कारण ताकाचे दुष्परिणाम अगदी नगण्य आहेत आणि त्याचे फायदे जास्त.
ताक आपले पचन सुधारते आणि पोटातील चांगले जिवाणू वाढवते. आज आम्ही तुम्हाला ताकाच्या एका खास मसाल्याची रेसिपी सांगत आहोत. जो तुमच्या ताकाला अप्रतिम चव देतील. ही रेसिपी swast_ani_mast_recipes या अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला पाहूया हा स्पेशल ताक मसाला कसा बनवायचा.
ताक मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य..
- पुदिन्याची पानं
- 3 चमचे जिरे
advertisement
- 2 चमचे धने
- 1 चमचा ओवा
- 8 ते 10 काळी मिरी
- 1 चमचा काळं मीठ
- पाव चमचा हिंग
- पाव चमचा सुंठ पावडर
ताक मसाला बनवण्याची कृती..
- सर्वात आधी ताजी पुदिन्याची पानं घ्या आणि ती एका पॅनमध्ये टाकून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
- पुदिना काढून घ्या आणि त्याच पॅनमध्ये जिरे, धने, ओवा, काळी मिरी टाकून तेही व्यवस्थित भाजून घ्या.
advertisement
- हे सर्व थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्या, त्यामध्ये काळं मीठ, हिंग आणि सुंठ पावडर टाका.
- या मिश्रणात भाजलेला पुदिना टाकून याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या.
- अशाप्रकारे तुमचा ताक मसाला तयार आहे. आता हा एअर टाईट कंटेनरमध्ये तुम्ही महिनाभर साठवू शकता.
- जेव्हा तुम्हाला ताक बनवायचे असेल तेव्हा. तेव्हा अधिताक घ्या. किंवा दह्यामध्ये ओपन घालून ते घुसळून घ्या.
advertisement
- त्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ आणि साखर घाला. तसेच थोडी हिरवी मिरची आणि आलं ठेचून घ्या. तेही ताकामध्ये टाका.
- या सर्वांनंतर आपण तयार केलेला मसाला टाका आणि ताक पुन्हा चांगले घुसळून घ्या.
- आता हे ताक तुम्ही असेच पिऊ शकता किंवा हवे असल्यास त्यामध्ये बर्फदेखील घालू शकता.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 4:28 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Taak Masala : एकदाच बनवून ठेवा 'हा' स्पेशल ताक मसाला! महिनाभर राहील फ्रेश आणि चवीला तर एक नंबर..








