advertisement

Kitchen Tips : कॅसरोलमधील चपात्या दुपारपर्यंत ओल्या होतात? पाहा दिवसभर चांगल्या ठेवण्याची पद्धत

Last Updated:
Casserole Chapati Hacks : हल्ली प्रत्येककडे चपात्या साठवण्यासाठी कॅसरोल असतो, तो नसेल तर किमान स्टीलचा एखादा डबा तरी असतोच. त्यामध्ये आपण चपात्या साठवतो खऱ्या, पण काही वेळानंतर लगेच त्या चपात्या ओल्या होऊ लागतात. आज आम्ही तुम्हाला हे टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
1/7
काहीवेळा कॅसरोलमध्ये ठेवलेल्या चपात्या ओल्या होतात आणि नंतर त्या आपल्याला खाव्याशा वाटत नाही. म्हणून चपात्या डब्यामध्ये ओल्या होऊ नये आणि त्या दिवसभर फ्रेश आणि कोरड्या राहाव्या, यासाठी काही टिप्स पाहूया. (इमेज क्रेडिट - Meta AI)

2/7
सर्वात महत्त्वाचं म्हणजे चपात्या ठेवण्यासाठी मोठा डबा किंवा कॅसरोल वापरा. त्याचबरोबर चपात्या थोड्या थंड झाल्यावरच कॅसरोलमध्ये ठेवा. बरेच लोक चपातीला तूप लावतात आणि लगेच कॅसरोलमध्ये ठेऊन ते बंद करतात. पण असे करू नये.

3/7
गरम चपाती असताना सर्वात जास्त वाफ सोडते. म्हणून ती भाजल्यानंतर तूप लावा आणि किमान 1-2 मिनिटे बाहेर राहू द्या. थोडी थंड झाल्यावर कॅसरोलमध्ये ठेवा. यामुळे चपाती लवकर खराब होणार नाही.

4/7
चपाती ठेवल्यानंतर कॅसरोलचे झाकण लगेच पूर्णपणे बंद करू नका. कारण असे केल्याने वाफ अडकते आणि ओलाव्यामुळे चपाती ओली आणि चिकट होते. त्याऐवजी वाफ बाहेर पडण्यासाठी झाकण थोडेसे उघडे ठेवा.

5/7
गरम चपात्या कधीही अॅल्युमिनियम फॉइलमध्ये ठेवू नका, शक्यतो बटर पेपर वापरा. अॅल्युमिनियम फॉइल वाफ बाहेर जाण्यापासून रोखते, ज्यामुळे त्या लवकर ओल्या होतात. त्याऐवजी बटर पेपर वापरा.

6/7
चपात्या डब्यात ठेवण्याआधी त्यामध्ये खाली एक सुती कापड ठेवा. ही पद्धत सर्वात सोपी आणि प्रभावी मानली जाते. हे कापड आत तयार होणारी थोडीशी वाफ शोषून घेते आणि कॅसरोलमध्ये ओलावा जमा होण्यापासून रोखते.

7/7
कापड ठेवल्यानंतर त्यावर चपात्या ठेवा आणि त्यावर एक लहान स्टील प्लेट ठेवा. नंतर कॅसरोलचे झाकण बंद करा. स्टील प्लेट वाफ येण्यापासून रोखते, ज्यामुळे चपात्या बराच काळ मऊ राहतात आणि ओल्या होत नाहीत. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)

PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement