Bigg Boss Marathi 6 : लव्ह लपाटा, लिमिटमध्ये राहा! विशालवरून रुचिता-राखीत जुंपली
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Ruchita Rakhi Fight : बिग बॉस मराठी 6 मधील लव्ह कपल रुचिता आणि विशाल यांच्यातील प्रेमावरून रुचिता आणि राखीमध्ये जबरदस्त फायटिंग झाली आहे.
बिग बॉस मराठी 6 मध्ये रुचिता जामदार आणि राखी सावंत यांच्यातील वाद तसा सतत पाहायला मिळाला आहे. आता राखी आणि रुचिता यांच्या विशाल कोटियनवरून वाद झाला आहे. विशाल आणि रुचिता यांच्यात प्रेम फुलत असल्याचं सगळ्यांनीच पाहिलं आहे. यावरून यावरून आता राखी आणि रुचितामध्ये चांगलीच जुंपली आहे.
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात राखी आणि रुचिता विशालवरून भांडताना दिसतात. भांडण सुरू होतं ते भाऊच्या धक्क्यावरच. जिथं रितेश राखीला विचारतो, "राखी तुम्ही काय खेळलात. बिग बॉसमध्ये तुम्ही तर सगळ्यात जास्त एक्सपेरिअन्स आहात" यावर रुचिता म्हणते, "मुद्दे मिळत नव्हते म्हणून ती काहीही क्रिएट करत होती" यावर राखी म्हणते, "तुम्ही काय लव्ह लपाटा करता तिथं बसून"
advertisement
यावरून रुचिता भडकते. भाऊचा धक्कावर भांडणानंतरही ती हा विषय काढते. तिथं ती राखीला दटावतच येते, "तुला शेवटचं सांगतेय. काय असेल ना स्वत:च्या आयुष्यात स्वत: लक्ष दे लव्ह लपाटा आणि हे पपाटा तुला काय करायचं आहे राखी सावंत आहेस ना राखी सावंत राहा. माझ्या मागे मागे माझं शेपूट असल्यागत हिंडू नकोस गावभर. नवीन मुद्दे शोध, नवीन लोक शोध ज्यांच्याकडे बघता येईल"
advertisement
राखी आधी शांतपणे तिचं सगळं ऐकून घेते. नंतर विचारते, "काय झालं, शॉक लागला का, उंदीर चावला" यावर रुचिता तिला सांगते, "लिमिटमध्ये राहते ना, लिमिटमध्ये राहा पर्सनल, पर्सनल जाऊ नको. तू मला कोण सांगणारी"
यावर राखी म्हणते, "हे पर्सनल नाहीये मी या घरात राहते, माझे डोळे जे बघतात जे बघणार, ते मी सांगणार. या घरात जे होणार, मी बघणार, मी बोलणार"
advertisement
आता बिग बॉसच्या घरात विशाल आणि रुचिताच्या प्रेमावरून रुचिता आणि राखीत झालेला हा वाद कोणत्या टोकाला जातो, याचा घरातील वातावरणावर काय परिणाम होतो? हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
advertisement
दरम्यान रुचिता आणि राखीतील या वादात प्रेक्षकांनी मात्र राखीची साथ दिली आहे आणि रुचिताला ट्रोल केलं आहे. नेटिझन्स म्हणाले, तुला करायला लाज वाटत नाही तिने बोललं तर झोंबलं, खरं बोलल्यावर का मिरची झोंबली, तू करते म्हणून ती बोलते, तिला दिसतं ते ती बोलते, राखी सावंत आहे ती रुचिता तुला गार करायला आली आहे ती, राखी वाट लावायला आली आहे रुचिता तुझी.
advertisement
रुचिताचं असं आहे ना मी नाही त्यातली आणि काडी लाव आतली, तुला बघण्यात आम्हाला काहीच इंटरेस्ट नाही आहे. तुझं लव्ह लपेटा बाहेर जाऊन कर, अशा कमेंट लोकांनी केल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 3:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : लव्ह लपाटा, लिमिटमध्ये राहा! विशालवरून रुचिता-राखीत जुंपली









