advertisement

Bigg Boss फेम 'करोडपती' तान्या मित्तल बनली 'नवरी', शेअर केला VIDEO; लॅव्हिश लाइफस्टाईलमुळे होती चर्चेत

Last Updated:

Tanya Mittal : बिग बॉस 19 मध्ये दिसलेली तान्या मित्तलने स्वत:च आपले ब्राइडल लेहंग्यातील व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तसंच तयारी सुरू, त्याला आवडेल का? असे कॅप्शनही तिने दिले आहेत.

News18
News18
आपल्या लॅव्हिश लाइफस्टाईलमुळे चर्चेत आली बिग बॉस 19 फेम तान्या मित्तलच्या लग्नाची चर्चा होते आहे. याचं कारण आहे, तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेले व्हिडीओ. तान्या नवरीच्या ड्रेसमध्ये दिसली आहे. तिने लाल आणि निळ्या लहंग्यातील तिचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तयारी सुरू असं कॅप्शनही तिने दिलं आहे.
तान्या मित्तलने तिच्या नवरीच्या लेहंग्यातील व्हिडीओ पोस्ट करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. एका व्हिडीओमध्ये ती लाल रंगाच्या दुल्हन ड्रेसमध्ये दिसत आहे. ती ट्रायल रूममध्ये लेहंगा घालून बाहेर येते आणि सगळे तिच्यावर पुष्पवर्षावर करतात. नवरीसारखीच ती लाजते आणि गोलही फिरताना दिसते. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने 'तयारी सुरू झाली आहे." असं म्हटलं आहे.
advertisement
advertisement
त्यानंतर लगेचच तान्या मित्तलने आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती निळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसली. या पोस्टला कॅप्शन दिलं आहे, "त्याला हा लेहेंगा आवडेल का?"
हे दोन्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर तान्या मित्तल लग्न करते आहे, असा अंदाज तिचे चाहते आणि नेटिझन्सनी बांदला आहे. दरम्यान तान्या मित्तलने अद्याप तिच्या लग्नाची अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. काहींनी तान्या लवकर एक मोठा खुलासा करू शकते, तर काहींना हा तिचा एखादा प्रोजेक्ट असावा असंही म्हटलं आहे.
advertisement
advertisement
तान्या मित्तल ही एक प्रसिद्ध उद्योजिका, रिअॅलिटी टीव्ही स्टार आहे. 2025 च्या महाकुंभमेळ्यात तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती पहिल्यांदा देशभर चर्चेत आली. त्यानंतर बिग बॉस 19 मध्ये येऊन तिने लक्ष वेधलं. तिने स्वत:ला देशातील सगळ्यात श्रीमंती तरुणी, करोडपती म्हटलं. तिने तिच्या लॅव्हिश लाइफस्टाईल प्रदर्शन केलं. आपलं घर फाइव्ह स्टार हॉटेलसारखं आहे, 150 बॉडीगार्ड आहेत, बिग बॉसच्या घरात आपण 800 साड्या नेसलो असं ती म्हणाली होती. यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता अगदी बिग बॉसचा होस्ट सलमान खानचाही नाही.
advertisement
तान्या तिचा स्वतःचा ब्रँड, हँडमेड विथ लव्ह बाय तान्या देखील चालवते. तिचे इन्स्टाग्रामवर 25 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss फेम 'करोडपती' तान्या मित्तल बनली 'नवरी', शेअर केला VIDEO; लॅव्हिश लाइफस्टाईलमुळे होती चर्चेत
Next Article
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement