Healthy Breakfast : पराठे खाऊन बोअर झालात? बनवा हाय प्रोटीन मुगडाळ पनीर चिला, मुलंही आवडीने खातील!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
High protein mugdal paneer chila recipe in marathi : आज आपण पाहणार आहोत, हाय प्रोटीन मुगडाळ पनीर चिला कसा बनवायचा. यासाठी फक्त तुम्हाला आदल्या दिवशी मुगाची डाळ भिजवावी लागेल. मग दुसऱ्या दिवशी तुमचं काम सोपं आणि झटपट होईल.
मुंबई : आपण नाश्त्यामध्ये पराठे, डोसा, अनेक प्रकारचे चिला किंवा त्याला आपण थालीपीठ म्हणू शकतो, हे खात असतो. मात्र बऱ्याच पदार्थांमधून आपल्याला कार्ब्स जास्त मिळतात प्रोटीन नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक प्रोटीन पॅक रेसिपी घेऊन आलो आहोत. हा पदार्थ बनवणं अगदी सोपे आहे. फक्त तुम्हाला छोटीशी तयारी आदल्या दिवशी करावी लागेल.
आज आपण पाहणार आहोत, हाय प्रोटीन मुगडाळ पनीर चिला कसा बनवायचा. यासाठी फक्त तुम्हाला आदल्या दिवशी मुगाची डाळ भिजवावी लागेल. मग दुसऱ्या दिवशी तुमचं काम सोपं आणि झटपट होईल. ही रेसिपी shemusttry या अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला तर मग पाहूया, प्रोटीन रिच मुगडाळ पनीर चिला कसा बनवायचा.
हाय प्रोटीन मुगडाळ पनीर चिलासाठी लागणारे साहित्य
भिजवलेली मूगडाळ - 1/2 कप
advertisement
ताजी कोथिंबीर - 2 टेबलस्पून
हिरवी मिरची - 1
बेसन - 1 टेबलस्पून
इनो - 1/2 टीस्पून
तीळ - 1 टीस्पून
कांदा - 2 टेबलस्पून
टोमॅटो - 2 टेबलस्पून
पनीर - 50 ग्रॅम
मीठ - चवीनुसार
तेल - 1 टीस्पून
हाय प्रोटीन मुगडाळ पनीर चिला बनवण्याची पद्धत..
- सर्वात आधी भिजवलेली मूगडाळ कोथिंबिर, हिरवी मिरची आणि थोडे मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
advertisement
- तयार मिश्रण एका भांड्यात काढा. नंतर त्यामध्ये बेसन आणि मीठ घालून चांगले फेटून घ्या.
- आता हे मिश्रण चिला बनवण्यासाठी तयार आहे.
- मिश्रण तव्यावर टाकण्यापूर्वी त्यामध्ये इनो घाला आणि हलके मिक्स करा.
- पॅन गरम करा आणि त्याला हलके तेल लावा.
- आता एक वाटी मिश्रण तव्यावर डोशाप्रमाणे पसरवा. फक्त थोडे जाड ठेवा.
advertisement
- नंतर या मिश्रणावर तीळ, कांदा आणि टोमॅटो टाका. सोबतचे पनीर किसून घाला.
- एका बाजूने चिला भाजला गेल्यानंतर आता दुसऱ्या बाजूनेही चांगला भाजून घ्या.
- दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग आल्यानंतर तुमचा चिला तयार आहे.
- हा चिला तुम्ही हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करू शकता.
advertisement
या चिल्यामध्ये प्रोटीन मुबलक असते आणि कार्ब्स कमी असतात. हा चिला बराच काळ तुमचे पोट भरलेले ठेवतो. म्हणजे तुम्हाला सारखी भूक लागत नाही. यामध्ये कोणतेही रिफाइंड पीठ नाही. म्हणून हा आणखी हेल्दी बनतो.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 12:30 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Healthy Breakfast : पराठे खाऊन बोअर झालात? बनवा हाय प्रोटीन मुगडाळ पनीर चिला, मुलंही आवडीने खातील!









