शनीच्या राशीत 4 मोठ्या ग्रहांची युती! 'या' 4 राशींचे नशीब सोन्यासारखं चमकणार; तुमच्या राशीत आहे का राजयोग?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात जेव्हा एकाच राशीत चार मोठे ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्याला 'चतुर्गही योग' असे म्हटले जाते. फेब्रुवारी 2026 च्या उत्तरार्धात शनीच्या मालकीच्या कुंभ राशीत सूर्य, बुध, शनी आणि राहू या चार ग्रहांची युती होत आहे.
Astrology News : ज्योतिषशास्त्रात जेव्हा एकाच राशीत चार मोठे ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्याला 'चतुर्गही योग' असे म्हटले जाते. फेब्रुवारी 2026 च्या उत्तरार्धात शनीच्या मालकीच्या कुंभ राशीत सूर्य, बुध, शनी आणि राहू या चार ग्रहांची युती होत आहे. हा योग अत्यंत दुर्मिळ असून त्याचे परिणाम संपूर्ण जगावर आणि सर्व राशींवर दिसून येतील. या चतुर्गही योगामुळे या 4 राशींच्या जीवनात मोठे बदल होणार आहेत. विशेषतः मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ त्यांच्या नशिबाची दिशा बदलणारा ठरू शकतो.
मिथुन राशीच्या नशिबात काय बदल होणार?
मिथुन राशीसाठी हा योग नवव्या भावात म्हणजेच 'भाग्य स्थानी' तयार होत आहे. प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे अचानक मार्गी लागतील. जर तुम्ही परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल, तर या काळात यश मिळण्याचे प्रबळ योग आहेत. नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, राहूच्या प्रभावामुळे गुंतवणुकीत घाई करू नका. वडिलांशी असलेले मतभेद दूर होतील आणि कुटुंबात तुमचे स्थान उंचावेल.
advertisement
इतर 3 राशींवर होणारे परिणाम
कुंभ
हा योग तुमच्याच राशीत होत आहे, त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व आणि आरोग्यावर याचा प्रभाव पडेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. शनी आणि सूर्याच्या युतीमुळे तुमची जबाबदारी वाढेल. मात्र, मानसिक तणाव आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. संयमाने काम घेतल्यास मोठे यश मिळेल. तुमच्या करिअर आणि व्यवसायात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेतून चांगले फायदे मिळताना दिसतील. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
कन्या
कन्या राशीसाठी हा योग सहाव्या भावात निर्माण होत आहे. शत्रूंवर विजय मिळवाल. कोर्ट-कचेरीच्या कामात निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. मात्र, आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. पोटाच्या समस्या किंवा जुन्या आजारांकडे लक्ष द्यावे लागेल. पंचग्रही योगाच्या निर्मितीमुळे तुम्हाला जुन्या समस्यांपासून आराम मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ आणि पदोन्नतीची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असताना तुम्हाला नवीन संधी मिळतील. या काळात व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी, पंचग्रही योग त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले फायदे देईल.
advertisement
मीन
मीन राशीसाठी हा योग बाराव्या भावात होत आहे. विनाकारण होणारे खर्च वाढू शकतात. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळेल. आध्यात्मिक प्रवासाचे योग आहेत. मात्र, रात्रीची झोप पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड वाढू शकते. तुमचा आदर वाढेल आणि समाजात तुमची ओळख अधिक मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन यश मिळू शकते, व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 12:24 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
शनीच्या राशीत 4 मोठ्या ग्रहांची युती! 'या' 4 राशींचे नशीब सोन्यासारखं चमकणार; तुमच्या राशीत आहे का राजयोग?








