advertisement

Amravati News: कॉलेज पार्टीत दिलं गुंगीचं औषध, विद्यार्थिनीवर 2 सख्ख्या भावांकडून अत्याचार, VIDEO काढून 8 महिने...

Last Updated:

Crime in Amravati: कॉलेजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात एका विद्यार्थिनीसोबत अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे.

News18
News18
Crime in Amravati: कॉलेजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात एका विद्यार्थिनीसोबत अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. एका गेट-टुगेदर पार्टीत विद्यार्थिनीच्या पेयात गुंगीचं औषध मिसळून तिच्यावर दोन सख्ख्या भावांनी अत्याचार केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर, तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून तिला तब्बल सात ते आठ महिने ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी चेतन गणेश अंबाडकर आणि आकाश गणेश अंबाडकर (दोघेही रा. निर्मला कॉलनी, जुनीवस्ती, बडनेरा) या दोन भावांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. घटनेचा तपास केला जात आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यात घडली.

नेमकी घटना काय?

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, २६ मे २०२५ रोजी रहाटगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गेट-टुगेदर पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत चेतन आणि आकाश हे दोघेही सहभागी झाले होते. चेतनने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील पीडित विद्यार्थिनीला या पार्टीसाठी बोलावलं होतं. पार्टी सुरू असताना पीडितेच्या पेयात गुंगीचं औषध मिसळण्यात आलं. पेय प्राशन केल्यानंतर ती बेशुद्ध झाली. यानंतर आरोपी चेतन अंबाडकर याने हॉटेलमधील एका खोलीत नेऊन पीडितेवर अत्याचार केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
advertisement

आक्षेपार्ह व्हिडीओ आणि ५ लाखांची मागणी

या अमानुष कृत्यानंतर आरोपींनी पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काढले होते. हेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पीडितेचा छळ सुरू केला. भीतीपोटी विद्यार्थिनीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. एवढंच नव्हे तर आरोपींनी तिच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी देखील केली होती.
advertisement

पीडितेने दाखवले धाडस

गेल्या सात-आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या छळाला कंटाळून अखेर पीडितेनं धाडस दाखवलं आणि तिने थेट नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने दोन्ही आरोपी भावांविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amravati News: कॉलेज पार्टीत दिलं गुंगीचं औषध, विद्यार्थिनीवर 2 सख्ख्या भावांकडून अत्याचार, VIDEO काढून 8 महिने...
Next Article
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement