advertisement

Bigg Boss Marathi 6 च्या घरातील सगळे सदस्य आजारी! प्रत्येकाला कोणता ना कोणता आजार, तपासणीसाठी आले 'स्पेशल डॉक्टर'

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 मध्ये 'भाऊचा धक्का'वर आता स्पेशल डॉक्टर आले आहेत. जे घरातील सगळ्या सदस्यांची तपासणी करताना दिसले आहेत.

News18
News18
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील सगळे स्पर्धक आजारी पडलेत... हो तुम्ही बरोबर वाचलं आहेत. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक स्पर्धकाला कोणता ना कोणता आजार झाला आहे आणि त्यांचं हेल्थ चेकअप केलं जात आहे. सदस्यांच्या तपासणीसाठी घरात घरात स्पेशल डॉक्टर आले आहेत. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
बिग बॉस मराठी 6 च्या भाऊचा धक्काचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात घरातील सदस्यांचं हेल्थ चेकअप होत असल्याचं दिसत आहे, तेही स्पेशल डॉक्टरांकडून. आता हे स्पेशल डॉक्टर कोण? तर ड्रामा क्विन राखी सावंत. राखी सावंत डॉक्टर बनली आहे आणि घरातील इतर सदस्य रुग्ण. राखी या सगळ्यांना तपासताना दिसते आहे. 'सदस्यांच्या आजारावर डॉ. राखी करणार त्यांच्या स्टाईलने इलाज...', असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.
advertisement
advertisement
प्रोमोत तुम्ही पाहू शकता राखी एकेएकाला तपासाताना दिसते. रोशन तिच्यासमोर येतो त्याच्या छातीवर ती स्टेथोस्कोप ठेवते आणि म्हणते बाई कडक आहे, पण यावेळी तिने स्टेथोस्कोप कानात लावलेलाच नसतो. रितेश तिला त्याची आठवण करून देतो, यावर सगळे हसू लागतात. नंतर तन्वीबाबत ती म्हणते तन्वीचा क्लोजअप दर मुद्द्यांमध्ये असणारच असं म्हणते. रुचिताच्या डोक्याला हात लावून ती चेक करते आणि म्हणते तुम्हाला एकदा चेक करावं लागेल, डोक्यात प्रॉब्लेम आहे की कुठे प्रॉब्लेम आहे. यावर रुचिताही खळखळून हसते.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 च्या घरातील सगळे सदस्य आजारी! प्रत्येकाला कोणता ना कोणता आजार, तपासणीसाठी आले 'स्पेशल डॉक्टर'
Next Article
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement