Pune : धान्य भरडायला गेली अन् स्कार्फ मशिनमध्ये अडकला, रक्ताच्या थारोळ्यात पुण्यातील महिलेचा मृत्यू; वाढदिवशीच काळाचा घाला!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Crime Bhor Woman Accidental Death : पुण्यातील भोरमधील एका महिलेचा धान्य भरडायच्या मशिनमध्ये अडकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Pune Crime News : सध्या रब्बी हंगामातील काढणीला वेग आला आहे. अशातच शेतकरी वर्ग पुन्हा आपल्या कामाला लागला आहे. अशातच आता पुण्यातील भोरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कुरुंगवडी येथे मळणीयंत्रात केस आणि स्कार्फ अडकून एका महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली असून, वाढदिवसाच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
शुभांगी नीलेश राऊत (वय 41) असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून, त्या आपल्या शेतात मसूर आणि वाटाणा मळण्याचे काम करत होत्या. धान्य भरडण्याचे काम सुरू असताना त्या मशीनजवळ काही कारणासाठी वाकल्या आणि याच वेळी त्यांच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ आणि केस मळणीयंत्रात वेगाने ओढले गेले.
या भीषण अपघातात शुभांगी राऊत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. उपस्थित लोकांनी आणि नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नसरापूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
advertisement
विशेष म्हणजे, शनिवारी शुभांगी यांचा 41 वा वाढदिवस होता. घरात आनंदाचे वातावरण असताना आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा येत असतानाच ही घटना घडली. कुरुंगवडी गावावर या घटनेमुळे शोककळा पसरली असून राजगड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान, पुण्यातून काल अनेक धक्कादायक घटना समोर आल्या. पुण्यात आईच्या मित्राकडून तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक (Pune Crime News) माहिती समोर आली आहे. शाळेत सोडतो असं सांगून कारमध्येच नराधमाने त्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पुण्यातील प्रसिद्ध डीपी रोड परिसरात ही घटना घडली आहे. पीडित मुलीची आई विधवा आहे ती आणि ज्ञानेश्वर मागील अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत, त्यामुळे दोघांमध्ये चांगली ओळख होती.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 11:38 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : धान्य भरडायला गेली अन् स्कार्फ मशिनमध्ये अडकला, रक्ताच्या थारोळ्यात पुण्यातील महिलेचा मृत्यू; वाढदिवशीच काळाचा घाला!










