Mumbai : परदेशातील तंत्रज्ञान आता मुंबईच्या रस्त्यांवर, एमएमआरडीएने सुरू केला 'हा' मोठा उपक्रम
Last Updated:
Mumbai Transport : मुंबईतील नागरिकांनो आता सज्ज व्हा. शहरातील वाहतूकोंडी आणि बरचं काही बदलणार आहे,त्यासाठी एक नवा उपक्रम ही सुरु करण्यात आलेला आहे.
मुंबई : मुंबईकरांनो शहरातील वाढती वाहतूकोंडी ही दररोजची समस्या बनली आहे. दररोज कामाला जाणाऱ्या लोकांना याचा सामना करावा लागतो. मात्र आता हा प्रश्न कायमचा सुटणार आहे, त्यासाठी एक नवा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाने बदलणार मुंबईचा चेहरा
मुंबईची वाहतूक व्यवस्था अधिक स्मार्ट आणि नीटनेटके करण्यासाठी 'मुंबई ट्रान्सपोर्ट स्टॅक' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्ममुळे शहरातील विविध वाहतूक सेवांचा डेटा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे नियोजन अधिक अचूक होईल आणि प्रवाशांना चांगली सेवा देता येईल.
या उपक्रमासाठी एमएमआरडीए यांनी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका) यांच्यासोबत भागीदारी केली आहे. जायकाच्या डीएक्स लॅबच्या सहकार्याने हा डेटा-आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म उभारला जात आहे. जगातील इतर मोठ्या शहरांमध्ये जशी डेटा-आधारित वाहतूक व्यवस्था विकसित केली जाते त्याच धर्तीवर मुंबईतही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
advertisement
बुधवारी झालेल्या बैठकीत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, महा मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जायकाच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीनंतर मुंबई ट्रान्सपोर्ट स्टॅक अधिकृतपणे सुरु करण्यात आला.
मेट्रो, बस अन् लोकल आता एकाच प्लॅटफॉर्मवर
या प्लॅटफॉर्ममुळे मेट्रो, बस, लोकल ट्रेन आणि इतर वाहतूक व्यवस्थांचा डेटा एकत्रित केला जाईल. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करणे, वेळेचे अचूक नियोजन आणि प्रवाशांना रिअल टाइम माहिती देणे शक्य होणार आहे. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत हा डिजिटल बदल महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 11:41 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : परदेशातील तंत्रज्ञान आता मुंबईच्या रस्त्यांवर, एमएमआरडीएने सुरू केला 'हा' मोठा उपक्रम










