advertisement

रूमाल बांधून चौघं आले अन्.. अल्पवयीन मुलासोबत धक्कादायक घडलं; पुण्यातील वर्दळीच्या सिंहगड रस्त्यावर थरार

Last Updated:

वर्दळीच्या सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात शनिवारी सायंकाळी एक धक्कादायक घटन घडली. यात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर चार अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने भीषण हल्ला केला

अल्पवयीन मुलावर हल्ला (AI Image)
अल्पवयीन मुलावर हल्ला (AI Image)
पुणे : पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. वर्दळीच्या सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात शनिवारी सायंकाळी एक धक्कादायक घटन घडली. यात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर चार अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने भीषण हल्ला केला. दिवसाढवळ्या भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
बर्गर किंगसमोर रचला मृत्यूचा सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास हा अल्पवयीन मुलगा माणिकबाग येथील 'बर्गर किंग' दुकानासमोर उभा होता. त्याच वेळी दोन दुचाकींवरून चार तरुण तेथे आले. ओळख पटू नये म्हणून त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. काहीही विचारण्यापूर्वीच त्यांनी या मुलावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला सोडून हल्लेखोर क्षणात पसार झाले.
advertisement
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सिंहगड रस्ता परिसरात नेहमीच मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जखमी मुलाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
आरोपींचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यावरून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की अन्य काही कारणास्तव, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस तपासाला वेग आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
रूमाल बांधून चौघं आले अन्.. अल्पवयीन मुलासोबत धक्कादायक घडलं; पुण्यातील वर्दळीच्या सिंहगड रस्त्यावर थरार
Next Article
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement