'त्याने आमचा हात घट्ट धरला…', चिमुकल्या फॅनसाठी जान्हवी किल्लेकरची धावाधाव, सांगितला 'त्या' कॅन्सर वॉरियरचा हृदय पिळवटून टाकणारा किस्सा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Jahnavi Killekar Video: एका चिमुकल्या 'कॅन्सर वॉरियर'साठी जान्हवी आणि ओमकार भोजने यांनी सर्व कामं सोडून धाव घेतली.
मुंबई : कधी कधी ग्लॅमरच्या या लखलखत्या दुनियेपलीकडे असं काही घडतं की, दगडी काळजाच्या माणसालाही पाझर फुटतो. अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून नेटकाऱ्यांचे डोळे ओले झाले आहेत. एका चिमुकल्या 'कॅन्सर वॉरियर'साठी जान्हवी आणि ओम यादव यांनी सर्व कामं सोडून धाव घेतली.
रुग्णालयातील तो चिमुकला चाहता
गेल्या दोन वर्षांपासून टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या खारघर येथील शाखेत एक चिमुकला जीव कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी दोन हात करतोय. वेदनांनी शरीर थकलेलं असतानाही, हा मुलगा मोबाईलवर जान्हवी आणि ओमकार भोजनेचे व्हिडिओ बघायचा. "हे बघितलं की मला थोडं बरं वाटतं," असं त्याचं म्हणणं जेव्हा त्याच्या पालकांनी ओमला कळवलं, तेव्हा ओमलाही अश्रू अनावर झाले.
advertisement
या चिमुकल्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जान्हवी आणि ओमने क्षणाचाही विलंब लावला नाही. १८ फेब्रुवारीला त्याला डिस्चार्ज मिळणार होता, नेमक्या त्याच दिवशी ही भेट ठरली. ओमने तर आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला शो संपवून चक्क ५०० किलोमीटरचा प्रवास करून थेट मुंबईत पोहोचला. रात्रभर डोळ्याला डोळा न लावता, केवळ एका चाहत्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी या दोन कलाकारांनी खारघर गाठलं.
advertisement
जान्हवीला पाहताच मिळाली नवी ऊर्जा
जेव्हा जान्हवी आणि ओमने त्या मुलाच्या खोलीत पाऊल ठेवलं, तेव्हा त्या थकलेल्या चेहऱ्यावर जे हसू उमटलं, ते कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठं होतं. जान्हवीने भावूक होत लिहिलं की, "त्याने आमचा हात इतका घट्ट धरला होता की जणू तो सांगत होता, तुम्ही आलात, आता मी पुन्हा लढायला सज्ज आहे. त्याच्या छोट्याशा हातात किती वेदना होत्या, पण त्याहून जास्त त्याच्यात धैर्य होतं."
advertisement
advertisement
या भेटीनंतर जान्हवीला एक मोठी शिकवण मिळाली. ती म्हणते, "बाहेरच्या जगात आपण किती छोट्या गोष्टींवर तक्रार करतो, पण हा छोटा योद्धा रोज मृत्यूशी लढतोय आणि तरीही हसतोय. जीवनात आशा कधीच सोडू नये, हे तो आम्हाला शिकवून गेला." जान्हवीने आपल्या सर्व चाहत्यांना विनंती केली आहे की, या चिमुकल्यासाठी एक छोटीशी प्रार्थना करा, कारण आजही त्याचा नशिबासोबतचा लढा सुरूच आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 4:34 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'त्याने आमचा हात घट्ट धरला…', चिमुकल्या फॅनसाठी जान्हवी किल्लेकरची धावाधाव, सांगितला 'त्या' कॅन्सर वॉरियरचा हृदय पिळवटून टाकणारा किस्सा








