SL vs ENG : बर्थडे बॉय LBW झाला, अंपायरकडे रिव्हूसाठी पळाला, पण निर्णयाने वाढदिवसाची पार्टी खराब झाली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
इंग्लंडचा बर्थडे बॉय चांगली फलंदाजी करेल अशी अपेक्षा होती. त्याने फलंदाजीची चांगली सूरूवात देखील केली होती. पण एका बॉलवर तो एलबीडब्ल्यू आऊट झाला.त्याच्यानंतर त्याने अंपायरकडे रिव्ह्यूसाठी मागणी केली होती. पण रिव्ह्यूमध्ये जो निकाल आला ते पाहता बर्थडे बॉयची पार्टी खराब झाली आहे.
Sri Lanka vs England : टी20 वर्ल्डकपच्या सुपर 8 सामन्यात आज श्रीलंकेच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत इंग्लंडचा डाव गडगडवला आहे. या सामन्यात इंग्लंडचा बर्थडे बॉय चांगली फलंदाजी करेल अशी अपेक्षा होती. त्याने फलंदाजीची चांगली सूरूवात देखील केली होती. पण एका बॉलवर तो एलबीडब्ल्यू आऊट झाला.त्याच्यानंतर त्याने अंपायरकडे रिव्ह्यूसाठी मागणी केली होती. पण रिव्ह्यूमध्ये जो निकाल आला ते पाहता बर्थडे बॉयची पार्टी खराब झाली आहे.
खरं तर हा बर्थडे बॉय दुसरा तिसरा कुणी नसून इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक आहे.हॅरी ब्रुकचा आज वाढदिवस असल्याने त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती.तसेच इंग्लंडचे झटपट विकेट पडल्याने त्याला आज मैदानावर टीकूण राहण्याची गरज होती.पण दुनिथ वलांगेने टाकलेल्या बॉलवर तो एलबीडब्ल्यू आऊट झाला होता.पण त्याला तो नॉट आऊट वाटल्याने त्याने रिव्ह्यू घेतला होता.
advertisement
रिव्ह्यूमध्ये पिंचिंग लाईन, इम्पॅक्ट इन लाईन देखील होते पण विकेट मिसिंग होतं.पण निर्णय अंपायर्स कॉलवर गेल्याने त्याला मैदान सोडाव लागलं. त्यामुळे नाबाद असताना देखील बर्थडे बॉय हॅरी ब्रुकला 14 धावांवर माघारी जावे लागले.त्यामुळे अंपायरच्या या निर्णयाने हॅरी ब्रुकची पार्टी खराब झाली.
इंग्लंडच्या डावाबद्दल बोलायचं झालं तर खूपच खराब सूरूवात झाली होती. फिल सॉल्ट आणि जोस बटलर सलामीला उतरल होते. यावेळी बटलर 7 धावांवर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर जेकॉब बेथेल 3 वर बाद झाला. टॉम बॅन्टन 6 वर रनआऊट झाला. जौफ्रा आर्चर शुन्यावर बाद झाला.
advertisement
त्यानंतर हॅरी ब्रुक आणि फिल सॉल्टने इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात ब्रुक चुकीच्या निर्णयामुळे एलबीडब्ल्यू आऊट झाला.त्यानंतर सॅम करन 11 धावांवर बाद झाला होता. लियाम डॉसन 6 वर बाद झाला. शेवटी जेमी ओवरटने 10 धावा काढून इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 146 धावा करून दिल्या.
श्रीलंकेकडून दुनिथ वेलालगेने सर्वाधिक 3 विकेट, महिशा तिक्ष्णाने 2 आणि दुश्मनात चमीराने 1 विकेट घेतली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 4:32 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SL vs ENG : बर्थडे बॉय LBW झाला, अंपायरकडे रिव्हूसाठी पळाला, पण निर्णयाने वाढदिवसाची पार्टी खराब झाली









