advertisement

IND vs BAN : स्मृती आता एकटी नाही... पुण्यातून मिळाली नवीन सुपरस्टार, भारताला एकहाती जिंकवून दिला आशिया कप!

Last Updated:

सांगलीच्या स्मृती मानधनानंतर आता टीम इंडियाला पुण्यातून नवीन सुपरस्टार मिळाली आहे. तेजल हसबनीसने टीम इंडियाला आशिया कपची ट्रॉफी जिंकवून दिली आहे.

स्मृती आता एकटी नाही... पुण्यातून मिळाली नवीन सुपरस्टार, भारताला एकहाती जिंकवून दिला आशिया कप!
स्मृती आता एकटी नाही... पुण्यातून मिळाली नवीन सुपरस्टार, भारताला एकहाती जिंकवून दिला आशिया कप!
मुंबई : आशिया कप रायजिंग स्टारच्या फायनलमध्ये भारताने बांगलादेशचा 46 रननी पराभव केला आहे. बँकॉकमध्ये या महिला स्पर्धेची फायनल झाली. पुण्याची तेजल हसबनीस आणि मुंबईची राधा यादव इंडिया ए च्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. आशिया कप रायजिंग स्टारच्या फायनलमध्ये इंडिया ए ची कर्णधार राधा यादवने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर इंडिया ए ची सुरूवात खराब झाली. 8.1 ओव्हरमध्ये 44 रनवरच इंडिया ए ने 4 विकेट गमावल्या होत्या.
सुरूवातीच्या 4 विकेट लवकर गेल्यानंतर पाचव्या क्रमांकावर आलेली तेजल हसबनीस आणि राधा यादव यांनी इंडिया ए चा डाव सावरला. तेजलने 34 बॉलमध्ये नाबाद 51 रनची खेळी केली, ज्यात तिने 3 फोर आणि एक सिक्स मारली. याशिवाय कर्णधार राधा यादवने 30 बॉलमध्ये 3 फोर आणि एका सिक्सच्या मदतीने 36 रन केले. तेजल आणि राधाच्या या पार्टनरशीपमुळे भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 134 रन केल्या.
advertisement
भारताने दिलेल्या 135 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या महिला टीमचा 19.1 ओव्हरमध्ये फक्त 88 रनवर ऑलआऊट झाला. भारताकडून प्रेमा रावतने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर सोनिया मेंढीया आणि तनुजा कनवरला 2-2 विकेट मिळाल्या. सैमा ठाकोर, मिन्नू मनी आणि राधा यादवला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

कोण आहे तेजल हसबनीस?

तेजल हसबनीसचा जन्म 16 ऑगस्ट 1997 ला पुण्यामध्ये झाला. तेजल महाराष्ट्र आणि वेस्ट झोनकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. सांगलीच्या स्मृती मानधनानंतर आता पुण्याची तेजल हसबनीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे तेजलला टीम इंडियातही संधी मिळाली. ऑक्टोबर 2024 मध्ये तेजलने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तेजलने तिची पहिली वनडे मॅच खेळली.
advertisement
तेजलने भारताकडून आतापर्यंत 6 वनडेमध्ये 46.66 च्या सरासरीने 140 रन केल्या आहेत, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs BAN : स्मृती आता एकटी नाही... पुण्यातून मिळाली नवीन सुपरस्टार, भारताला एकहाती जिंकवून दिला आशिया कप!
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement