advertisement

'दख्खनचा राजा'ने जुळवली जोडी! स्टार प्रवाहची लोकप्रिय नायिका चढली बोहल्यावर; कोल्हापूरच्या सेटवर सुरू झालेली लव्हस्टोरी

Last Updated:

Aetashaa Sansgiri Wedding: स्टार प्रवाहच्या 'तुझ्या सोबतीने' या मालिकेतील मुख्य नायिका म्हणजेच एतशा संझगिरी हिने आपला जोडीदार, अभिनेता निषाद भोईर याच्याशी आज, २२ फेब्रुवारी रोजी थाटामाटात लग्नगाठ बांधली.

News18
News18
मुंबई : मराठी सिनेसृष्टीत सध्या सनई-चौघड्यांचे सूर घुमतायत. नुकताच रेवती लेलेचा विवाहसोहळा पार पडला असतानाच, आता छोट्या पडद्यावरील आणखी एका लोकप्रिय जोडीने 'शुभमंगल सावधान' म्हणत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. स्टार प्रवाहच्या 'तुझ्या सोबतीने' या मालिकेतील मुख्य नायिका म्हणजेच एतशा संझगिरी हिने आपला जोडीदार, अभिनेता निषाद भोईर याच्याशी आज, २२ फेब्रुवारी रोजी थाटामाटात लग्नगाठ बांधली.

कोल्हापूरचं ते शूटिंग अन् निषादने केलेलं प्रपोज

एतशा आणि निषादची ही प्रेमकथा एखाद्या मालिकेच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नाही. या दोघांची पहिली भेट 'दख्खनचा राजा जोतिबा' या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेचे शूटिंग कोल्हापूरच्या निसर्गरम्य परिसरात सुरू होते. कामाच्या ओघात मैत्री झाली आणि एकदा दोघेही कोल्हापूर फिरण्यासाठी बाहेर पडले. त्याच वेळी निषादने आपल्या मनातील भावना एतशासमोर व्यक्त केल्या. एतशानेही होकार दिला आणि त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाची सुरुवात झाली. विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांच्या नात्यानंतर एतशाने ही गोष्ट आपल्या घरी सांगून दोघांच्या घरच्यांची परवानगीही मिळवली होती. त्यानंतर तब्बल ४ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.
advertisement

मराठमोळा साज अन् कलाकारांची मांदियाळी

ऑक्टोबर २०२५ मध्ये या दोघांचा साखरपुडा पार पडला होता, तेव्हापासूनच चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता होती. आज पार पडलेल्या विवाहसोहळ्यात एतशा आणि निषाद अत्यंत देखणे दिसत होते. दोघांनीही पारंपारिक मराठमोळ्या पेहरावाला पसंती दिली होती. लग्नाच्या फोटोंमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जातोय. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते आणि सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंनी सध्या धुमाकूळ घातला आहे.
advertisement
advertisement

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय जोडी

एतशा संझगिरीने 'राजा राणीची गं जोडी', 'पुण्यश्लोक अहिल्याबाई' आणि 'निवेदिता माझी ताई' यांसारख्या सुपरहिट मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या ती 'तुझ्या सोबतीने' या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. दुसरीकडे निषाद भोईर हा देखील एक कसलेला अभिनेता आहे. तो नुकताच 'सावळ्याची जणू सावली' आणि 'आई-मायेचं कवच' या मालिकांत झळकला होता. विशेष म्हणजे, या दोघांनी 'निवेदिता माझी ताई' आणि 'दख्खनचा राजा जोतिबा' या दोन्ही मालिकांमध्ये एकत्र काम केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'दख्खनचा राजा'ने जुळवली जोडी! स्टार प्रवाहची लोकप्रिय नायिका चढली बोहल्यावर; कोल्हापूरच्या सेटवर सुरू झालेली लव्हस्टोरी
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement