advertisement

Ajit Pawar: घातपात की तांत्रिक बिघाड? अजित पवारांच्या विमानअपघाताचा सस्पेन्स संपणार; केंद्राकडून मोठी अपडेट

Last Updated:

अखेर केंद्र सरकारने हा बहुप्रतीक्षित अहवाल कधी जाहीर होणार, याची अधिकृत माहिती दिल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : बारामतीजवळ 28 जानेवारी रोजी घडलेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर निर्माण झालेल्या संशयाच्या वादळावर आता लवकरच पडदा पडणार आहे. या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात असताना, संपूर्ण देशाचे लक्ष चौकशी अहवालाकडे लागले आहे. अखेर केंद्र सरकारने हा बहुप्रतीक्षित अहवाल कधी जाहीर होणार, याची अधिकृत माहिती दिल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी झालेला विमान अपघात हा वैमानिकाचा वापर करून घडवून आणलेला घातपात असू शकतो, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तसेच त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केले आहे. कोण काय म्हणत यात जायचं नाही. आमच्या खात्यातील तपास यंत्रणा वेळोवेळी तपासाबद्दल माहित देत आहे.
advertisement

काय म्हणाले मुरलीधर मोहोळ? 

अजित पवारांच्या अपघाताविषयी माहिती देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, अजित पवार पवार यांच्या विमान अपघाताचा  प्राथमिक अहवाल 28 फेब्रुवारी आधीच येणार आहे. अजित पवार यांच्या विषयी दोन दिवसांपूर्वी सिविलएव्हियेशियने स्पष्ट स्वरुपात प्रसिद्धीपत्रक दिली आहे त्यात खुलासा दिला आहे आमच्या खात्यातील तपास यंत्रणा वेळोवेळी तपास करतयाबद्दल माहित देत आहेत. जे आरोप करत आहेत त्यांनी योग्य ठिकाणी त्यांच म्हणणं मांडलं आहे.
advertisement

नेमकं काय घडलं? 

28  जानेवारी रोजी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामतीला विमानाने येत होते. सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास अजितदादांचं विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ घसरलं. या अपघातात अजितदादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कडे देण्यात आला आहे. या प्रकरणी एकीकडे आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहे.
advertisement

प्राथमिक अहवालात काय समोर येणार? 

AAIB कडून फ्लाइट डेटा, विमानाच्या देखभाल नोंदी, ऑपरेशनल पद्धती आणि निर्णयप्रक्रिया या सगळ्या बाबींचा तपास सुरू आहे. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपासाचा प्राथमिक अहवाल समोर येणार आहे. या अहवालामध्ये अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं, विमानात बिघाड होता का, राष्ट्रवादीच्याा आमदारांनी केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का, याचे उत्तर आता या अहवालातून मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar: घातपात की तांत्रिक बिघाड? अजित पवारांच्या विमानअपघाताचा सस्पेन्स संपणार; केंद्राकडून मोठी अपडेट
Next Article
advertisement
IND vs SA : 14 बॉलर,15-15 मिनिटांचे 3 सेशन,टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' आफ्रिकेच्या चिंधड्या उडवणार
14 बॉलर,15-15 मिनिटांचे 3 सेशन,टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' आफ्रिकेच्या चिंधड्या
  • टीम इंडियाचं सिक्रेस सेशन

  • भारताच ब्रम्हास्त्र आफ्रिकेला धुळ चारणार

  • आफ्रिकेच काही खरं नाही

View All
advertisement