advertisement

शरद पवार यांच्या संसदीय राजकारणाची 'साठी' पूर्ण, जयंत पाटील यांची खास पोस्ट

Last Updated:

शरद पवार यांचा १९६७ सालापासून सुरू झालेला संसदीय राजकारणातला प्रवास आजही सुरू आहे.

शरद पवार-जयंत पाटील
शरद पवार-जयंत पाटील
मुंबई : देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संसदीय राजकारणाची साठी आज पूर्ण केली. शरद पवार यांचा १९६७ सालापासून सुरू झालेला संसदीय राजकारणातला प्रवास आजही सुरू आहे. त्यांच्या संसदीय राजकारणाच्या साठीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री जयंत पाटील यांनी खास पोस्ट लिहिली आहे.

देशाच्या संसदेत निवडून जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते पण...

भारतीय लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचे स्थान म्हणजेच या देशाची संसद आणि राज्याची विधिमंडळ होय. लोकशाहीमध्ये संसद सार्वभौम असते, सर्वोच्च असते. त्याचे कारण लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी या ठिकाणी लोकांच्या हिताच्या हिताचे रक्षण करण्याचे काम करत असतात. देशातील लाखो लोकांचे राज्याच्या विधिमंडळात अथवा देशाच्या संसदेत निवडून जाण्याचे स्वप्न असते, पण खूप कमी जणांना हे भाग्य लागते. त्यापैकीच आपले शरद पवार साहेब हे होय. मात्र शरद पवार साहेबांना हे भाग्य लाभले ते केवळ आणि केवळ त्यांच्या अखंड आणि अविरत परिश्रमांमुळे...
advertisement

जनतेच्या शहाणपणाची ही पावतीच...

आज शरद पवार साहेब त्यांच्या संसदीय कारकिर्दीच्या साठाव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. व्यक्ती म्हणून अर्थात हि मोठी उपलब्धी आहेच पण त्यासोबतच भारतीय लोकशाहीतील जनतेच्या शहाणपणाची ही एक पावतीच म्हणायला लागेल. एक अत्यंत, कर्तृत्ववान, परिश्रम करणाऱ्या आणि कायम जनतेच्या हितांचा विचार करणाऱ्या अशा पवार साहेबांना भारतातील आणि महाराष्ट्रातील जनता सातत्याने साठ वर्षे निवडून देत आहे.
advertisement

तिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेलेले पान म्हणजे शरद पवार

देशाच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेलेले पान म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब होय. साहेब, आपल्या या अविरत सेवेसाठी महाराष्ट्र आणि देशातील जनता आपल्याबद्दल सदैव कृतज्ञ आहे, असे जयंत पाटील आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवार यांच्या संसदीय राजकारणाची 'साठी' पूर्ण, जयंत पाटील यांची खास पोस्ट
Next Article
advertisement
IND vs SA : 14 बॉलर,15-15 मिनिटांचे 3 सेशन,टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' आफ्रिकेच्या चिंधड्या उडवणार
14 बॉलर,15-15 मिनिटांचे 3 सेशन,टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' आफ्रिकेच्या चिंधड्या
  • टीम इंडियाचं सिक्रेस सेशन

  • भारताच ब्रम्हास्त्र आफ्रिकेला धुळ चारणार

  • आफ्रिकेच काही खरं नाही

View All
advertisement