advertisement

चॉकलेट देतो म्हणून मुलाला घरी बोलावलं, दरवाजा बंद केला अन्..., पुजाऱ्याच्या कृत्यानं जालना हादरलं!

Last Updated:

Jalna News: निलेश कुलकर्णी याने मुलासह त्याच्या मित्रांना चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या राहत्या खोलीत बोलावून घेतले.

News18
News18
जालना: जालन्यात एका पुजाऱ्यानेच 13 वर्षाच्या मुलावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. निलेश निशिकांत कुलकर्णी असे जांब समर्थ येथील 28 वर्षीय पुजाऱ्याचे नाव आहे. त्याने चाॅकलेटचे आमिष दाखवून 13 वर्षीय बालकाला घरी बोलावले आणि अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसारात संताप व्यक्त केला जात आहे.
18 जानेवारी 2026 रोजी रविवारी पीडित 13 वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि त्याचे सहकारी मित्र खेळत होते. त्यावेळी आरोपीने त्या मुलासह त्याच्या मित्रांना चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या राहत्या खोलीत बोलावून घेतले. खोलीत गेल्यानंतर आरोपीने दरवाजा बंद करून मुलांना कपडे काढण्यास सांगितले व स्वतःही अश्लील कृत्ये केल्याचा आरोप आहे.
advertisement
पीडित मुलगा व त्याच्या मित्रांसोबत गैरवर्तन करत, पीडितास जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रार दाखल झाली आहे. नकार दिल्यानंतर आरोपीने मुलाचा हात पकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन मुलाशी जबरदस्ती करत त्याच्याशी अश्लील वर्तन केले. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन कुणाला न सांगण्याचा इशारा दिल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.
घडलेला प्रकार पीडित मुलाने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ घनसावंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
advertisement
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए. के. ढाकणे करीत आहेत. दरम्यान, जांबसमर्थ गावात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
चॉकलेट देतो म्हणून मुलाला घरी बोलावलं, दरवाजा बंद केला अन्..., पुजाऱ्याच्या कृत्यानं जालना हादरलं!
Next Article
advertisement
IND vs SA : 14 बॉलर,15-15 मिनिटांचे 3 सेशन,टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' आफ्रिकेच्या चिंधड्या उडवणार
14 बॉलर,15-15 मिनिटांचे 3 सेशन,टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' आफ्रिकेच्या चिंधड्या
  • टीम इंडियाचं सिक्रेस सेशन

  • भारताच ब्रम्हास्त्र आफ्रिकेला धुळ चारणार

  • आफ्रिकेच काही खरं नाही

View All
advertisement