Tomato : टोमॅटोचा हलवा, विचित्र वाटेल पण अनेकांनी ट्राय केलाय, हा घ्या Recipe Video
- Published by:Priya Lad
Last Updated:
Tomato Halwa Recipe Video : टोमॅटो हलवा वाचूनच विचित्र वाटतं. तुम्हाला वाटलं तसं आम्हालाही वाटलं. पण या रेसिपीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत आणि अनेकांनी तो चांगला लागत असल्याचंही म्हटलं आहे.
हलवा म्हटलं की गाजरचा हलवा, दुधीचा हलवा, पण तुम्हाला विश्वास बसणार नाही टोमॅटोचाही हलवा बनतो. हो बरोबर वाचलंत तुम्ही. टोमॅटोचा हलवा. ज्याचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. बहुतेक लोकांनी टोमॅटोचा हलवा बनवला आणि त्याचे रेसिपी व्हिडीओ शेअर केले आहेत.
टोमॅटो हलवा वाचूनच विचित्र वाटतं. तुम्हाला वाटलं तसं आम्हालाही वाटलं. त्यामुळे खरंच टोमॅटो हलवा बनवतात का याबाबत आम्ही इंटरनेटवर थोडं सर्च केलं. तेव्हा आम्हाला मिळालेल्या माहितीनसार टोमॅटो हलवा हैदराबादमध्ये बनवला जातो. ज्याला शाहजहांने मीठा या नावानेही ओळखलं जातं. ही माहिती इंटरनेटवर मिळालेली आहे.
advertisement
यानंतर आम्ही टोमॅटो हलवा कसा बनवायचा, याच्या काही रेसिपी आहेत का? हे पाहिलं तेव्हा आम्हाला बरेच रेसिपी व्हिडीओ मिळाले. त्यापैकी एक व्हिडीओ आम्ही तुम्हाला इथं देत आहोत. ज्यात टोमॅटो हलवा बनवण्यासाठी काय लागतं आणि तो बनवतात कसा हे पाहायला मिळेल.
टोमॅटो हलव्यासाठी लागणारं साहित्य
टोमॅटो
साखर किंवा गूळ
तेल किंवा तूप
advertisement
मिक्ल पावडर
वेलची पावडर
टोमॅटो हलवा कसा बनवायचा?
सगळ्यात आधी टोमॅटोला मधे 4 चीर द्या. हे टोमॅटो उकळत्या पाण्यात टाकून उकडून घ्या. 5 मिनिटांनी ते थंड पाण्यात काढा. त्याच्या साली निघालेल्या तुम्हाला दिसतील. त्या हातांनी पूर्णपणे काढून टाका. आता हे टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट करून घ्या.
advertisement
एका पॅनमध्ये किंवा कढईत तेल किंवा तूप घ्या. त्यात टोमॅटोची पेस्ट टाकून ती परता. पेस्ट थोडा वेळ परतल्यानंतर त्यात साखर टाका. पुन्हा ती परतत राहा. आता पेस्ट घट्ट होईपर्यंत परतयाची आहे. आता यात मिल्क पावडर आणि वेलची पूड टाकून पुन्हा परता. थोड्या वेळाने तुम्हाला मिश्रण भांड्यापासून वेगळं होताना दिसेल म्हणजे ते भांड्याला चिकटणार नाही. आता तुमचा हलवा तयार आहे. यात ड्रायफ्रूट्स टाकून तुम्ही सर्व्ह करू शकता.
advertisement
Kitchen with fozia युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आता टोमॅटोचा हलवा कसा लागेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यासाठी आम्ही व्हिडीओमध्ये कमेंट्स पाहिल्या. या व्हिडीओवर कमेंट करताना अनेकांनी ही रेसिपी चांगली असल्याचं म्हटलं आहे. काहींनी हा हलवा आंबट गोड लागत असल्याचं सांगितलं. तुम्ही एकदा हा टोमॅटो हलवा बनवून पाहा आणि कसा झाला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Location :
Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 9:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Tomato : टोमॅटोचा हलवा, विचित्र वाटेल पण अनेकांनी ट्राय केलाय, हा घ्या Recipe Video








