advertisement

Carrot Recipe Video : गाजर हलवा किती खाणार, आजीने बनवलेली गाजराची चटणी एकदा ट्राय करून पाहा

Last Updated:

Carrot Chutney Recipe Video : चटणी म्हणजे जेवणात तोंडी लावायचा पदार्थ. तुम्ही आजवर वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खाल्ल्या असाल. पण गाजराची चटणी पाहणं दूर कधी ऐकलंही नसेल.

News18
News18
गाजर म्हटलं की सामान्यपणे गाजरचा हलवा.  गाजराचे गुलाबजामुनही तुम्ही खाल्ले असतील. पुलाव किंवा भाजीतही गाजर वापरले जातात. पण गाजराची चटणी... तुम्ही खाणं दूर कधी पाहिली नसेल किंबहुना ऐकलंही नसेल. गाजराची चटणी... गाजराचा हटके असा पदार्थ एका आजीने दाखवला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
चटणी म्हणजे जेवणात तोंडी लावायचा पदार्थ. तुम्ही आजवर वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खाल्ल्या असाल. खोबऱ्याची चटणी, कैरीची चटणी, चिंचेची चटणी, आवळ्याची चटणी अशा आंबट चटणी, दुसरं म्हणजे लसूण चटणी, तिळाची चटणी असेही प्रकार पाहायला मिळतात. मग गाजराची चटणी... ती कशी काय बुवा?  कशी लागेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चटणी म्हणजे खोबऱ्यासारखी गाजर वाटून करायची का? तर नाही. गाजराची चटणी हा पदार्थ जितका वेगळा तितकीच तो बनवण्याची पद्धतही वेगळी आहे. आता गाजराची चटणी कशी बनवायची ते पाहुयात.
advertisement
गाजराची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी गाजर किसून घ्या. आता हे किसलेलं गाजर उन्हात वाळवायचे आहेत. तिसऱ्या-चौथ्या दिवसापर्यंत गाजर चांगले वाळता.
आता सुक्या खोबऱ्याचे काप करून घ्या. ते कढईत भाजून घ्या. खोबऱ्याचे काप चांगले भाजले की त्यात वाळलेलं गाजर टाकून भाजून घ्या. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढा. यात लसणीच्या पाकळ्या सोलून टाका. आवडीनुसार तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्या. गाजराची चटणी तयार.
advertisement
आहे की नाही सोपी रेसिपी. मग आता सतत गोड गोड गाजर हलवा खाऊन कंटाळला असाल तर मग आजीने दाखवलेली ही गाजराची चटणी ट्राय करायला हरकत नाही.
advertisement
@udarambharnam या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एकदा तुम्हीही बनवून पाहा आणि कशी झाली आम्हालाही आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Carrot Recipe Video : गाजर हलवा किती खाणार, आजीने बनवलेली गाजराची चटणी एकदा ट्राय करून पाहा
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement