advertisement

Recipe Video : मुगाचं वरण तर नेहमीच खाता, आता बनवा ढक्कू; पचायला हलका आणि चवीला जबरदस्त

Last Updated:

Moong Daal Recipe Video : मुगाच्या डाळीपासून बनवला जाणारा पदार्थ ढक्कू, अनेकांसाठी नवा असेल. पण खरंतर हा जुना, पारंपारिक, विस्मरणात गेलेला पदार्थ आहे.

News18
News18
मुगाची डाळ म्हटली की त्याचं वरण.... जे आपण नेहमी खातो. याशिवाय मुगाच्या डाळीचा शिरा बनवतात, भजीही बनवतात. पण तुम्ही कधी मुगाच्या डाळीचा ढक्कू खाल्ला आहे का? नाव वाचूनच तुम्हाला हसून येईल. पण वरणासारखा दिसणारा, पचायला हलका आणि चवीला जबरदस्त असा हा पदार्थ आहे.
ढक्कू हा कोकणातील पदार्थ. तसा तो वेगवेगळ्या डाळींपासून वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. पण मुगाच्या डाळीचा ढक्कू फेमस आहे, असं शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलं. त्यांनीच याची रेसिपीही दाखवली आहे. त्याचा व्हिडीओ त्यांनी युट्युबवर शेअर केला आहे.
advertisement
मुगाच्या डाळीचा ढक्कू बनवण्यासाठी साहित्य
मुगाची डाळ
गरम पाणी
हळद
बारीक चिरलेला कांदा
हिंग
काळी मिरी पूड
मीठ
तेल
मोहरी
हिरवी मिरची
लसूण
हिंग कोथिंबीर
मुगाच्या डाळीचा ढक्कू कसा बनवायचा?
मुगाची डाळ मंद आचेवर खमंग भाजून घ्या. तोपर्यंत डाळीच्या तिप्पट पाणी एका भांड्यात उकळायला ठेवा. आता भाजलेल्या डाळीत हे गरम पाणी ओता. आता त्यात हळद, बारीक चिरलेला कांदा आणि तुम्हाला जितकं तिखट हवं तितकी काळी मिरीची पूड टाका. मंद आचेवर शिजवून घ्या. डाळ शिजली की ती घोटून घ्या. गरजेनुसार पाणी घाला. चवीनुसार मीठ टाकून ढवळून घ्या.
advertisement
आता फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, हिरवी मिरची, लसूण आणि गॅस बंद करून हिंग टाका. ही फोडणी डाळीत ओता. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. डाळ ढक्कू तयार. तुम्ही हे भाजीसोबत आणि भातासोबतही खाऊ शकता.
advertisement
रोजच्या मुगाच्या वरणापेक्षा वेगळ्या पद्धतीची ही डाळ ढक्कू एकदा ट्राय करून पाहा आणि कसा झाला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Recipe Video : मुगाचं वरण तर नेहमीच खाता, आता बनवा ढक्कू; पचायला हलका आणि चवीला जबरदस्त
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement