Poha Recipe : कांदेपोहे खाऊन कंटाळलात मग बनवा पोहा चटणी आणि चटणीचे पोहे; पोह्याचे हटके 2 पदार्थ
- Published by:Priya Lad
Last Updated:
Poha Recipe Video : कांदेपोह्यांपेक्षाही झटपट होतील आणि खाताच पोट आणि मन दोन्ही भरेल असे पोह्याचे वेगळे दोन पदार्थ.
पोहे म्हटलं की त्यापासून कांदेपोहे हाच पदार्थ पटकन आठवतो. कित्येक घरातील हा नाश्ताच आहे. कांदेपोहे म्हणजे पटकन होणारा पोटभर असा पदार्थ. पण तरी दररोज किती कांदेपोहे खाणार नाही का? कांदेपोहे खाऊन खाऊन पण कंटाळा आला असेल. तर आता आम्ही तुमच्यासाठी कांदेपोह्यांसारखेच पोह्यांचे झटपट होणारे दोन नवीन पदार्थ आणले आहेत.
पोहा चटणी आणि चटणीचे पोहे हे पोह्यांचे दोन पदार्थ. दोन्ही पदार्थांच्या नावात चटणी असली तरी पदार्थ वेगळे आहेत. पोहा चटणी का पारंपारिक कोंकणी पदार्थ आहे आणि तो झटपट तयार होतो. झटपट पोह्यांचं हे व्हर्जन आहे. तर चटणीचे पोहे हा वेगळा पदार्थ. आता हे दोन्ही पदार्थ कसे बनवायचे ते पाहुयात.
advertisement
पोहा चटणी
साहित्य
1 चमचा तेल
1 चमचा मोहरी
चिमूटभर हिंग
कढीपत्ता
सुक्या लाल मिरच्या
कप खोवलेलं सुकं खोबरं
पाव चमचा गूळ (ऐच्छिक)
1 चमचा सांबार मसाला
चवीनुसार मीठ
1 चमचा लाल तिखट
1 कप पातळ पोहे
कृती
कढईत तेल गरम करा. मोहरी घाला, ती तडतडली ही हिंग आणि सुक्या लाल मिरच्या टाका. आता एका भांड्यात ओल्या नारळाचा किस घ्या, हवं असेल तर गूळ घाला, सांबार मसाला, मीठ, लाल तिखट सगळं नीट मिक्स करून घ्या. आता तयार केलेली फोडणी ओतून मिक्स करून घ्या. आता यात पातळ पोहे घालून हातांनीच मिक्स करून घ्या. पोहा चटणी खायला तयार.
advertisement
हवा असल्यास तुम्ही यात बारीक चिरलेला कांदा घालू शकता पण पारंपरिक रेसिपीत कांदा टाकला जात नाही.
ओल्या चटणीचे पोहे
साहित्य
हिरव्या मिरच्या
कोथिंबीपर
ओल्या नारळाचे तुकडे
advertisement
लसूण
पोहे
तेल
मीठ
मोहरी
हिंग
हळद
कढीपत्ता
पाणी
मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, ओल्या नारळाचा किस किंवा तुकडे करून एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या. यात हवं तर तुम्ही लसूणही टाकू शकता. पोहे ओले होतील इतकं पाणी पोह्यांना लावा. ते जास्त भिजवायचे नाहीत. हे पोहे एका भांड्यात घ्या. त्यावर तयार केलेली चटणी आणि मीठ टाकून मिक्स करून बाजूला ठेवून द्या.
advertisement
एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करा. त्यात मोहरी टाका. ती तडतडली की गॅस बंद करा. यात हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, हळद टाकून ही फोडणी पोह्यांवर ओतून मिक्स करून घ्या. खायला तयार ओल्या चटणीचे पोहे.
advertisement
MadhurasRecipe Marathi आणि Masteer Recipes या दोन युट्युब चॅनेलवर दाखवण्यात आलेले हे दोन पदार्थ. तुम्ही नक्की ट्राय करून पाहा आणि कसे झाले ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Location :
Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 9:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Poha Recipe : कांदेपोहे खाऊन कंटाळलात मग बनवा पोहा चटणी आणि चटणीचे पोहे; पोह्याचे हटके 2 पदार्थ









