Gajar Recipe Video : गाजर हलवा खाऊन खाऊन कंटाळलात, मग आता बनवा गाजराचे गुलाबजामुन
- Published by:Priya Lad
Last Updated:
Gajar Gulabjamun Recipe Video : गाजराचे गुलाबजामुन ते कसे काय बनवायचे असा प्रश्न तुम्हाला पडले असेल. गाजराचे गुलाबजामुन ज्यासाठी तुम्हाला गाजर हलव्यासारखे गाजर किसायचीही गरज नाही. आता ते कसे बनवायचे ते पाहुयात.
गाजर म्हटलं की त्याच्यापासून कोणता पदार्थ... तर अनेकांच्या तोंडात पटकन नाव येतं ते गाजर हलवा. सामान्यपणे गाजरापासून हलवाच बनवला जातो आणि हा सीझन गाजराचा त्यामुळे या सीझनमध्ये भरपूर गाजर खाऊन घ्यायचे आहेत. पण दररोज गाजर हलवा खाऊन खाऊनसुद्धा कंटाळा आला आहे. मग आता त्याचं वेगळं काय करता येऊ शकतं? तर आम्ही ही गाजराच कंटाळलात, मग आता बनवा गाजराचे गुलाबजामुन.
गुलाबजामुन म्हणजे मैदा, मावा याच्यापासून तयार केले जातात. पण गाजराचे गुलाबजामुन ते कसे काय बनवायचे असा प्रश्न तुम्हाला पडले असेल. गाजराचे गुलाबजामुन ज्यासाठी तुम्हाला गाजर हलव्यासारखे गाजर किसायचीही गरज नाही. आता ते कसे बनवायचे ते पाहुयात.
advertisement
गाजर सोलून कापून ते मिक्सरमध्ये वाटून घ्या. गॅसवर कढई ठेवून गरम करून त्यात एक चमचा तूप टाका. वाटलेलं गाजर तुपात 2-3 मिनिटं परतून घ्या. एक कप दूध टाका. आता यात अर्धा कप रवा टाका. मिश्रण दाटसर होईपर्यंत ढवळत राहा. आता मिश्रण थंड करायला ठेवा. तोपर्यंत गॅसवर दुसरं भांडं ठेवून त्यात एक कप पाणी एक कप साखर टाकून साखरेचा पाक तयार करून घ्या.
advertisement
आता 4 चमचा खोबऱ्याचा किस, 2-3 चमचे मिल्क पावडर आणि थोडंसं दूध टाकून दाटसर पेस्ट तयार करून घ्या. गाजराच्या पेस्टचे छोटे छोटे गोळे करून त्यात नारळाची पेस्ट भरून गोळे बनवून घ्या आणि तेलात डीप फ्राय करून साखरेच्या पाकात टाका. थोडा वेळ झाकून ठेवा. गाजराचे गुलाबजामुन तयार.
advertisement
Flavours of Peace Palace युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही ही रेसिपी करून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Location :
Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 10:17 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Gajar Recipe Video : गाजर हलवा खाऊन खाऊन कंटाळलात, मग आता बनवा गाजराचे गुलाबजामुन










