4 तासांचा कॅफे, नोकरी सांभाळत करतात व्यवसाय, दोन इंजिनिअर मित्रांची कहाणी, Video
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आयटी क्षेत्रात प्रोजेक्टनुसार बदलणाऱ्या नोकऱ्या आणि जॉब सिक्युरिटीचा अभाव यामुळे तरुणांमध्ये पार्टटाइम व्यवसाय सुरू करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कांदिवलीतील दोन मित्रांनी मिळून एक वेगळा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.
मुंबई : आजच्या काळात अनेक तरुण नोकरी करत असतानाच भविष्यातील सुरक्षिततेचा विचार करून पर्याय शोधताना दिसत आहेत. विशेषतः आयटी क्षेत्रात प्रोजेक्टनुसार बदलणाऱ्या नोकऱ्या आणि जॉब सिक्युरिटीचा अभाव यामुळे तरुणांमध्ये पार्टटाइम व्यवसाय सुरू करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कांदिवलीतील दोन मित्रांनी मिळून एक वेगळा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.
जीत वाघेला आणि कार्तिक हे दोघेही गेली चार वर्षांपासून आयटी क्षेत्रात काम करत आहेत. दोघांनाही जवळपास साडेपाच लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज आहे. मात्र, पुढील काळात नोकरीची खात्री नसणे, प्रोजेक्ट संपल्यानंतर नोकरीवर परिणाम होण्याची शक्यता यामुळे त्यांनी फक्त नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा पर्याय तयार करण्याचा निर्णय घेतला. याच विचारातून त्यांनी दोघांनी मिळून स्वतःच्या सेव्हिंग्समधून गुंतवणूक करत कांदिवलीमध्ये क्रेओ क्लॉक्स या नावाने पार्टटाइम कॅफे सुरू केला. दोघेही सध्या नोकरी करत असतानाच हा व्यवसाय सांभाळत आहेत.
advertisement
हा कॅफे संध्याकाळच्या वेळेत, साधारण चार ते पाच तास चालवला जातो. येथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ अगदी 60 रुपयांपासून उपलब्ध असल्याने परिसरातील तरुणांमध्ये हा कॅफे लोकप्रिय ठरत आहे.
advertisement
या व्यवसायातून सध्या दरमहा सुमारे 60 ते 70 हजार रुपयांची कमाई होत आहे. विशेष म्हणजे, फक्त चार-पाच तासांच्या कामातून मिळणारी ही कमाई पाहता, भविष्यात हा व्यवसाय पूर्णवेळ केल्यास अधिक चांगला नफा मिळू शकतो, असा विश्वास या दोघा मित्रांनी व्यक्त केला आहे.
नोकरीसोबतच स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा पर्याय निवडत या दोघांनी पुढील काळासाठी मजबूत पायाभरणी केली आहे. कांदिवलीतील जीत वाघेला आणि कार्तिक यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 6:43 PM IST





