TRENDING:

नागपुरात हायप्रोफाइल सेक्स रॅकेट, महिलाच निघाली मास्टरमाइंड, तरुणींना जाळ्यात ओढायची अन्...

Last Updated:

Nagpur Crime News: नागपूर शहरात सुरू असलेल्या 'ऑपरेशन शक्ती' मोहिमेअंतर्गत नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका सलूनच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी नागपूर: नागपूर शहरात सुरू असलेल्या 'ऑपरेशन शक्ती' मोहिमेअंतर्गत नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका सलूनच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली असून, याप्रकरणी मुख्य आरोपी महिला दीपा गोदडे हिला अटक केली आहे. तिच्याकडून मोबाईलसह एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक सायंकाळी गस्त घालत असताना त्यांना मंगलम अपार्टमेंटमधील 'लुक बुक बाय इनारा युनिसेक्स सलून'मध्ये देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने या सलूनवर धाड टाकली.

छाप्यादरम्यान, सलूनची मालक दीपा गोदडे आणि तिची साथीदार पूजा जोश (पूजा फरार आहे) या दोघी संगनमत करून महिलांना पैशांचे आमिष दाखवत त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे समोर आले. तसेच त्या ग्राहकांना सलूनमध्येच जागा उपलब्ध करून देत होत्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुरीवर अळीचा प्रादुर्भाव? असं करा रोग व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञांच्या सल्ला
सर्व पहा

या कारवाईत पोलिसांनी दोन पीडित महिलांना त्यांच्या तावडीतून सोडवले. आरोपी दीपा गोदडे हिच्याविरोधात सीताबर्डी पोलीस ठाण्यात 'अनैतिक देहव्यापार प्रतिबंध अधिनियम' कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी सीताबर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी फरार आरोपी पूजा जोशचा शोध पोलीस घेत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
नागपुरात हायप्रोफाइल सेक्स रॅकेट, महिलाच निघाली मास्टरमाइंड, तरुणींना जाळ्यात ओढायची अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल