मिळालेल्या माहितीनुसार, सोलर एक्सप्लोसिव्ह ही खाजगी क्षेत्रातील स्फोटके निर्माण करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीच्या कारखान्यात हा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सध्या सुरू आहे. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले आहे. उर्वरित दहा जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement
या स्फोटात कैलास वर्मा, मनीष वर्मा, सनी कुमार, अरुण कुमार, अतुल मडावी, सौरभ डोंगरे, तेजस बांधते, सूरज गुटके, अखिल बावणे आणि धर्मपाल मनोहर अशी जखमींची नावे आहेत.
या घटनेतील एक दिलासादायक बाब म्हणजे, स्फोट होण्याआधी आग लागल्यामुळे काही कामगारांना प्लांटमधून बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाला. यामुळे मोठा अनर्थ टळला, परंतु स्फोटामुळे उडालेल्या मलब्याच्या तुकड्यांमुळे दोन कामगार गंभीर जखमी झाले. सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.