पाहा संपूर्ण वेळापत्रक...
नेताजी सुभाषचंद्र बोस स्थानकातून इतवारी ते जयनगर (बिहार) दरम्यान ही स्पेशल ट्रेन धावणार असून यामुळे विदर्भातील प्रवाशांना बिहारला जाण्यासाठी थेट आणि सोयीस्कर मार्ग उपलब्ध होईल. या गाडीच्या दोन मार्गांपैकी ट्रेन क्रमांक 08869 इतवारी ते जयनगर गाडी 16, 23, 30 ऑक्टोबर आणि 6 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता इतवारी स्थानकावरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 10:30 वाजता जयनगरमध्ये पोहोचेल. परतीचा प्रवास, ट्रेन क्रमांक 0880 जयनगर ते इतवारी, 18,25 ऑक्टोबर तसेच 1, 6 नोव्हेंबर रोजी जयनगरहून रात्री 12.30 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता इतवारी स्थानकावर पोहोचेल. या गाड्या गोंदिया, डोंगरगड आणि राजनांदगाव याठिकाणीही थांबतील.
advertisement
कोणत्या गाड्यांचा समावेश असेल?
यंदा विविध उत्सवांसाठी अधिक स्पेशल ट्रेन देखील राबवण्यात आल्या आहेत. त्यात बिलासपूर-हडपसर (पुणे)-बिलासपूर, बिलासपूर-यलहंका-बिलासपूर, दुर्ग-सुलतानपूर-दुर्ग, दुर्ग-हजरत निजामुद्दीन-दुर्ग, दुर्ग-पटणा फेस्टिव्हल स्पेशल, इतवारी-शालीमार-इतवारी, इतवारी-धनबाद फेस्टिव्हल स्पेशल, गोंदिया-पटणा फेस्टिव्हल स्पेशल यांचा समावेश आहे. या सर्व गाड्यांमध्ये प्रवाशांना कन्फर्म सीट मिळवण्याची हमी देण्यात आली आहे. जे प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
प्रवाशांच्या विविध गरजांचा विचार करून या गाड्यांमध्ये एकूण 20 डबे जोडण्यात आले आहेत. यात दोन एसएलआर, पाच जनरल, दोन थर्ड एसी, एक सेकंड एसी आणि दहा स्लीपर कोचांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या गरजेप्रमाणे प्रवासाची सोय निवडता येईल.
सणांच्या काळात जसे की नवरात्र, दुर्गापूजा, दिवाळी आणि छठपूजा, प्रवाशांसाठी पूजा स्पेशल ट्रेन सेवा सुरू केली जात आहे. या गाड्यांमध्ये जो पहिला येईल त्याला पहिली सीट तत्त्वावर कन्फर्म सीट मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना गर्दीची काळजी न करता त्यांच्या घरच्या लोकांसोबत आनंदाने सण साजरे करता येईल.
या विशेष सेवेमुळे नागपूरसह विदर्भातील प्रवाशांना सोयीस्कर, आरामदायक आणि थेट प्रवासाची संधी मिळेल. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तसेच सणांच्या काळात होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवरही याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. या उपाययोजनेमुळे लोकांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी होईल.