फलटणमधील डॉक्टर महिलेच्या लैंगिक छळाचं हे प्रकरण ताजं असताना आता असाच प्रकार नागपुरात देखील घडला आहे. इथं एका २३ वर्षीय तरुणीने एका पोलीस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप केले आहे. संबंधित पोलिसानं लग्नाचं आमिष दाखवून आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं तरुणीने म्हटलं आहे. या प्रकरणी तरुणीन तीन आठवड्यांपूर्वी पोलीस ठाण्यात फिर्याद देखील दाखल केली. मात्र त्यावर अद्याप कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
advertisement
उमेश शेळके असं आरोप झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. तो नागपूर पोलीस दलात पोलीस कर्मचारी आहे. त्याने लग्नाचं आमिष दाखवून आपल्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप २३ वर्षीय तरुणीने केला होता. या प्रकरणी नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशनमध्ये तीन आठवड्यांपूर्वी तक्रार दिली होती.
पोलिस कर्मचाऱ्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अजूनही आरोपी विरोधात ठोस कारवाई झाली नसल्याचा पीडित तरुणीचा आरोप आहे. दुसऱ्या बाजूला पोलीस आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला शोधण्यात गेले तीन आठवडे अपयशी ठरले असून तो फरार झाला आहे, एवढंच उत्तर पोलिसांकडून दिलं जात आहे. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
