TRENDING:

खरातने 5 नरबळी दिले, हरणाची कस्तुरी अन्.. सरकारी वकिलांनी 'कॅप्टन'ची कुंडलीच काढली; 7 मिनिटात कोर्टात काय काय घडलं?

Last Updated:

खरातने नरबळी दिल्याचा संशय सरकारी वकिलांनी व्यक्त केला असून मोठी खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक :  नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे बाहेर येत आहेत. अनेक महिला त्याच्या लैंगिक छळाला बळी पडल्या आहेत. दमदाटी करून त्याने अनेक जमिनी लाटल्याचे समोर आले आहे. या खरातचे अजून मोठे कांड समोर येत आहेत. त्याच्याविरोधात दाखल गुन्ह्यांची संख्या आता 6 इतकी झाली आहे. त्याची पोलीस कोठडी आज संपली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्या आज कोर्टात युक्तिवाद करताना सरकारी वकिलांनी धक्कादायक खुलासा केला आहे. खरातने नरबळी दिल्याचा संशय सरकारी वकिलांनी व्यक्त केला असून खरातला सात पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली
News18
News18
advertisement

महिला लैंगिक अत्याचारातील आरोपी आणि स्वतःला कॅप्टन म्हणून मिरवणाऱ्या अशोक खरातची गेल्या 4 दिवसांपासून एसआयटी चौकशी सुरू आहे. दरम्यान, एसआयटीच्या चौकशीत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. तसेच, दुसरीकडे पीडित महिलाही समोर येत असून खरातविरुद्ध गुन्हा दाखल करत आहेत. आज कोर्टात खरातला दाखल केल्यानंतर विशेष पोलीस पथकातील अधिकारी सूर्यवंशी यांनी न्यायालयाला खरात याच्यासंदर्भाने माहिती दिली. अशोक खरात हा स्वत:ला सिद्ध पुरूष म्हणवून घ्यायचा. येणाऱ्या महिलांना तो पेढा आणि विशेष प्रकारचे पाणी प्यायला द्यायचे, असे सांगितले.

advertisement

6 लाख 53 हजारांची रोकड आणि लॅपटॉप जप्त केला, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. तसेच खरात याच्या फार्महाऊसवर पिस्तुलाच्या 5 पुंगळ्या सापडल्याचेही त्यांनी सांगितले. खरातने नरबळी दिल्याचा संशयही सरकारी वकिलांनी न्यायालयात उपस्थित केला. खरात वाघ आणि साप लोकांना दाखवून त्यांच्या मनात भीती निर्माण करायचा. हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी लोकांना द्यायचा असाहा संशय सरकारी वकिलांनी कोर्टात उपस्थित केला.

advertisement

सरकारी वकिलांनी  काय म्हणाले?

खरातने हरणाची हत्या केल्याचा संशय

खरात वाघ, साप लोकांना दाखवायचा

हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी लोकांना द्यायचा

खरातकडे काळ्या रंगाचं, रिव्हॉल्हर, त्यावर राजमुद्रा

खरातने नरबळी दिल्याचा सरकारी वकिलांचा संशय

खरातने कस्तुरीसाठी हरणाची शिकार केली

खरातचे वकील काय म्हणाले?

खरात प्रकरणी पेन ड्राईव्हचा कुठे उल्लेख नाही

खरातला पुन्हा कोठडी वाढवण्याची गरज नाही

advertisement

अजून कोणतीही कागदपत्र घेण्याचं बाकी राहिलं नाही

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आता पेरणीचं काम होणार सोपे, सोलापुरातील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र, किंमत किती? Video
सर्व पहा

रजिस्टर ऑफिसमधून कागदपत्र मिळू शकतात

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खरातने 5 नरबळी दिले, हरणाची कस्तुरी अन्.. सरकारी वकिलांनी 'कॅप्टन'ची कुंडलीच काढली; 7 मिनिटात कोर्टात काय काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल