TRENDING:

उपरे पडले भारी! नाशिकमध्ये भाजपने माजी महापौरांसह या 16 जणांना बसवलं घरी, वाचा यादी

Last Updated:

Nashik Election 2025 : महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी नाशिकचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Nashik Election
Nashik Election
advertisement

नाशिक : महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी नाशिकचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. तिकीट वाटपावरून सर्वच पक्षांत काही प्रमाणात अस्वस्थता दिसत असली, तरी भारतीय जनता पक्षात (भाजप) ही नाराजी अधिक ठळकपणे समोर आली. निष्ठावान, वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि अलीकडेच पक्षात प्रवेश केलेले नवीन नेते यांच्यातील संघर्ष निवडणूक प्रक्रियेत उघडपणे दिसून आला. त्यामुळे यंदाची नाशिक महानगरपालिका निवडणूक केवळ पक्षांमधील राजकीय लढत न राहता, अंतर्गत असंतोष, शक्तिप्रदर्शन आणि राजकीय गणितांची कसोटी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

advertisement

नाशिक महापालिकेच्या १२२ जागांसाठी भाजपकडे तब्बल बाराशेहून अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले होते. यामध्ये तिकीट वाटपापूर्वी इतर पक्षांतील काही प्रस्थापित नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्याने आधीच जुने कार्यकर्ते नाराज होते. प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर करताना चार ते पाच विद्यमान नगरसेवकांसह अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने असंतोषाचा उद्रेक झाला. परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न केवळ तात्पुरता ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, नाराजीचे पडसाद शहरातील विविध प्रभागांमध्ये उमटताना दिसत आहेत.

advertisement

माजी नगरसेवक सतीश सोनवणे, कमलेश बोडके, शशिकांत जाधव, तसेच माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह अनेक माजी मंडलाध्यक्ष आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना तिकीट नाकारण्यात आल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थतेचे वातावरण आहे. “या अंतर्गत नाराजीचा थेट परिणाम निवडणूक निकालावर होईल,” असा सूचक इशारा काही नाराज कार्यकर्त्यांनी दिला आहे. याउलट, विरोधी महाविकास आघाडी तुलनेने एकसंध दिसत असून, त्यांनी तिकीट वाटप अधिक नियोजनबद्ध केल्याचे चित्र आहे. मात्र, अर्ज दाखल करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत एकमेकांना थेट आव्हान दिले.

advertisement

एबी फॉर्मसाठी गोंधळ

एबी फॉर्म वितरणासाठी शहराच्या बाहेर असलेले विल्होळी येथील व्हिजन व्हिला चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. अनेक इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः विनवण्या करत एबी फॉर्म मिळवण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी भावनिक दृश्येही पाहायला मिळाली. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप करत आमदारांविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. निवडणूक अधिकारी कार्यालयाबाहेर सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवार कैलास आहिरे यांच्यात झालेल्या बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

advertisement

भाजपने कुणाची उमेदवारी कापली?

भाजपकडून माजी महापौर अशोक मुर्तडक, शीतल माळोदे, पूनम सोनवणे, कमलेश बोडके, सतीश सोनवणे, शाहीन मिर्झा, रूची कुंभारकर, शशिकांत जाधव, वर्षा भालेराव, प्रियांका घाटे, अंबादास पगारे, दिलीप दातीर, पंडित आवारे, मीरा हांडगे, माजी स्वीकृत नगरसेवक श्यामला दीक्षित आणि प्रशांत जाधव यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

कोणत्या पक्षाचे किती उमेदवार मैदानात?

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी विविध पक्षांनी पुढीलप्रमाणे उमेदवार दिले आहेत. भाजप ११८ (प्रभाग क्रमांक १४ मध्ये एकही उमेदवार नाही), शिवसेना (शिंदे गट) ८०, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४१, शिवसेना (ठाकरे गट) ८२, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ३१, मनसे ३४, आम आदमी पार्टी ३५, माकप ९ आणि काँग्रेस २२ उमेदवारांसह रिंगणात उतरली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बाजरीची भाकरी नेहमीच खाता; थंडीत नक्की ट्राय करा हा पौष्टिक पदार्थ, सोपी रेसिपी
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उपरे पडले भारी! नाशिकमध्ये भाजपने माजी महापौरांसह या 16 जणांना बसवलं घरी, वाचा यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल