TRENDING:

Earthquake: नाशिक हादरलं! त्र्यंबकेश्वरच्या हरसूलमध्ये 24 तासांत 4 वेळा भूकंपाचे धक्के

Last Updated:

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परिसरात २४ तासांत चार सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले, नागरिकांमध्ये भीती, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अति उष्णता आणि पाऊस असा निसर्गाचा प्रकोप सुरू असताना आता नाशिकवर नवीन संकट ओढवलं आहे. नाशिक जिल्ह्यात भूगर्भातील हालचालींनी प्रशासनाची चिंता वाढवली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परिसरात गेल्या २४ तासांत तब्बल चार वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. हे भूकंपाचे धक्के जरी सौम्य असले तरी चिंता वाढवणारे आहेत. वारंवार होणाऱ्या या कंपनांमुळे हरसूल परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
advertisement

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हरसूल आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जमिनीच्या पोटातून गूढ आवाज येत असून त्यानंतर सौम्य धक्के जाणवत आहेत. हे धक्के जरी सौम्य असले तरी, हे 24 तासांत चार वेळा घडल्याने नागरिक अस्वस्थ आहेत. सुदैवाने, या धक्क्यांमुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा घरांचे मोठे नुकसान झालं नाही. भूकंपाच्या या धक्क्यांची माहिती मिळताच स्थानिक महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे.

advertisement

भूकंपाची तीव्रता किती?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबला 13000 रुपये भाव, आल्याचे दरही सुधारले, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

हे धक्के नेमके किती रिश्टर स्केलचे होते, याची अधिकृत माहिती भूकंप मापन केंद्राकडून घेतली जात आहे. भूकंप तज्ज्ञांच्या मते, भूगर्भातील खडकांमध्ये होणाऱ्या हालचालींमुळे किंवा 'टेक्टोनिक प्लेट्स'मधील घर्षणामुळे असे सौम्य धक्के बसू शकतात. हरसूल परिसरात यापूर्वीही अशा प्रकारचे अनुभव आले आहेत, मात्र एकाच दिवसात चार वेळा धक्के बसणे हा चर्चेचा आणि तपासाचा विषय ठरला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Earthquake: नाशिक हादरलं! त्र्यंबकेश्वरच्या हरसूलमध्ये 24 तासांत 4 वेळा भूकंपाचे धक्के
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल