Nashik Municipal Election 2026 : लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नाशिक : राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत संपुष्ठात आली आहे. दरम्यान आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी तुफान राडे झाले आहे. ज्या इच्छुक उमेदवारांना तिकीट नाकारण्यात आलं होतं त्यांनी आंदोलन केली, आत्मदहनाचा प्रयत्न केल्याच्या देखील घटना घडल्या होत्या. नाशिकमध्ये तर एबी फॉर्म वाटपावरून मोठा राडा झाला होता. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये एबी फॉर्म देण्यावरून कैलास अहिरे आणि आमदार सीमा हिरे यांच्यात बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. या बाचाबाचीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. दरम्यान नेमकी हा बाचाबाची कोणत्या कारणावरून झाली होती.
advertisement
नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून भाजपमध्ये मोठा गोंधळ झाला होता. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये एबी फॉर्म देण्यावरून कैलास अहिरे आणि आमदार सीमा हिरे यांच्यात बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण बाचाबाची निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर सूरू होती.
खरं तर कैलास अहिरे यांना एबी फॉर्म दिलेला असताना आमदारांनी तिकीट कापण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या आरोपातूनच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालया बाहेरच भाजप पदाधिकारी कैलास अहिरे आणि आमदार सीमा हिरे यांच्यात 'तू तू में में' झाली होती.या बाचाबाचींमुळे भाजपमधला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. तसेच सोशल मीडियावर भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
खरं तर आमदार सीमा हिरे या निवडणुक कार्यालयाच्या आत जात होत्या. या गोष्टीला कैलास अहिरे यांचा प्रचंड विरोध होता.ते सतत सीमा हिरे यांना बाहेर काढण्यास सांगत होते. कार्यालयाबाहेरचा हा राडा पाहून निवडणूक निर्णय़ अधिकारी देखील बाहेर येतात, यावेळी 40-40 वर्ष आमचा बळी दिला, आम्ही रक्ताच पाणी केल, असे कैलास अहिरे बोलताना दिसले. शांततेत बोला इथे कुणी तुमच्याशी भांडायला आले नाही, असे म्हणताच दोघांमध्ये बाचाबाची सूरू झाली. या बाचाबाची व्हिडिओ व्हायरल झाला आहे.