कपाशीच्या दरात किंचित घट
कृषी मार्केटच्या वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्यातील कृषी बाजारात एकूण 25 हजार 193 क्विंटल कपाशीची आवक झाली. यामध्ये वर्धा मार्केटमध्ये 7 हजार 314 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. कपाशीला 7396 ते 8010 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. अकोला, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा मार्केटमध्ये 8010 रुपये सर्वाधिक दर नोंदवण्यात आला. सोमवारी मिळालेल्या दराच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात 10 रुपयांची घट झाली आहे.
advertisement
कांद्याच्या दरात मोठी घट
आज राज्यातील कृषी बाजारात 2 लाख 21 हजार 037 क्विंटल कांद्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 58 हजार 659 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. कांद्याला 568 ते 2244 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याला 100 ते 2800 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सोमवारी मिळालेल्या दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात लक्षणीय घट दिसून आली.
सोयाबीनच्या दरात घट
राज्यात आज 61 हजार 735 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यामध्ये लातूर मार्केटमध्ये 17 हजार 499 क्विंटल आवक नोंदवली गेली. सोयाबीनला 4257 ते 4864 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. जळगाव आणि सातारा मार्केटमध्ये 5328 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक दर मिळाला. सोमवारीच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात काहीशी घट झाली आहे.
तुरीच्या दरात किंचित वाढ
आज राज्यातील कृषी बाजारात 12 हजार 004 क्विंटल तुरीची आवक झाली. यामध्ये जालना मार्केटमध्ये 3 हजार 240 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक झाली. पांढऱ्या तुरीला 5000 ते 7576 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आलेल्या 54 क्विंटल काळ्या तुरीला 7850 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक दर मिळाला. सोमवारीच्या तुलनेत आज तुरीच्या दरात किंचित वाढ दिसून येत आहे.





