TRENDING:

Success Story : तोटा झाला तरी निर्णय घेतला, टरबूज लागवड ठरली फायद्याची, ज्ञानेश्वरला 8 लाखांचा नफा

Last Updated:

मागील वर्षीही त्याने टरबूजाची लागवड केली होती, पण गारपिटीमुळे त्यावेळीही त्याचे नुकसान झाले होते. तरीसुद्धा यावर्षी पुन्हा एकदा टरबूज लागवड करण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : बीड जिल्ह्यातील ज्ञानेश्वर चव्हाण हा तरुण शेतकरी आपल्या जिद्दी आणि मेहनतीच्या बळावर यशाची नवी कहाणी घडवत आहे. त्याच्याकडे जेमतेम दोन एकर शेती असून पूर्वी तो त्या शेतीमध्ये कापूस आणि सोयाबीनची लागवड करत होता. यावर्षीही त्याने दीड एकर क्षेत्रात कापूस तर अर्धा एकर क्षेत्रात सोयाबीनची लागवड केली होती. मात्र अवकाळी पावसामुळे दोन्ही पिके पाण्याखाली जाऊन पूर्णपणे नष्ट झाली. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने ज्ञानेश्वर चव्हाण काही काळ निराश झाला होता.
advertisement

अचानक आलेल्या या संकटामुळे त्याच्यासमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले होते. मात्र खचून न जाता त्याने पुन्हा उभे राहण्याचा निर्धार केला. हिवाळी हंगामात टरबूजाची लागवड करता येते याची त्याला माहिती होती. मागील वर्षीही त्याने टरबूजाची लागवड केली होती, पण गारपिटीमुळे त्यावेळीही त्याचे नुकसान झाले होते. तरीसुद्धा यावर्षी पुन्हा एकदा टरबूज लागवड करण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतला.

advertisement

उसाच्या शेतात केली मका लागवड, एका ताटाला आली आठ कणीसे, कसा केला यशस्वी प्रयोग?

ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या या निर्णयाला गावातील अनेकांनी विरोध केला. मागील अनुभव लक्षात घेता पुन्हा टरबूज लागवड करणे धोक्याचे ठरू शकते, असे काहींनी सांगितले. तरीही आपल्या निर्णयावर ठाम राहत त्याने सावकाराकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले. टरबूज लागवडीसाठी सुमारे एक लाख दहा हजार रुपयांचा खर्च आला. त्यानंतर मेहनत आणि योग्य नियोजन करत त्याने संपूर्ण पिकाची काळजी घेतली.

advertisement

मेहनतीचे फळ अखेर गोड मिळाले. यावर्षी टरबूज पिकाला चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे त्याला मोठा फायदा झाला. केवळ एका हंगामात टरबूज लागवडीतून त्याला सुमारे सात ते आठ लाख रुपयांचा नफा मिळाला. त्यामुळे कर्ज फेडूनही त्याच्या हातात चांगली रक्कम उरली असून त्याचा आत्मविश्वास देखील वाढला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नेहमीच्या पिकांपेक्षा नवा प्रयोग, खर्चही आला कमी, वर्षाला 5 लाखांची कमाई फिक्स!
सर्व पहा

माणसाने संकटांना घाबरून न जाता जिद्दीने आणि मेहनतीने काम केले, तर यश नक्की मिळते, असे ज्ञानेश्वर चव्हाण सांगतात. त्यांच्या या यशस्वी प्रयत्नामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही नवे धाडस करण्याची प्रेरणा मिळत आहे. कमी जमिनीतही योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर चांगले उत्पन्न मिळू शकते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Success Story : तोटा झाला तरी निर्णय घेतला, टरबूज लागवड ठरली फायद्याची, ज्ञानेश्वरला 8 लाखांचा नफा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल