Success Story : नेहमीच्या पिकांपेक्षा नवा प्रयोग, खर्चही आला कमी, आता वर्षाला 5 लाखांची कमाई फिक्स!
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
रवींद्र भोकरे हे गेल्या पाच वर्षांपासून फुलशेती करत आहेत. दरवर्षी ते विविध प्रकारच्या फुलांची लागवड करत असतात.
छत्रपती संभाजीनगर : पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळत आहेत. याचप्रमाणे फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खुर्द येथील शेतकरी रवींद्र भोकरे हे गेल्या पाच वर्षांपासून फुलशेती करत आहेत. दरवर्षी ते विविध प्रकारच्या फुलांची लागवड करत असतात. यंदा देखील त्यांनी एक एकरमध्ये 10 हजार 500 कलमांची नारंगी आणि अक्षदा येल्लो या दोन वाणांची लागवड केली आहे.
या फुलशेतीच्या माध्यमातून दीडशे क्विंटलपर्यंत फुलउत्पादन निघेल. आतापर्यंत एक लाख रुपयांचे उत्पन्न या शेतीतून मिळाले आहे. तसेच आणखी यामध्ये 2 लाखांची वाढ होऊन असे एकूण उत्पन्न अडीच ते तीन लाखांपर्यंत मिळेल, अशी अपेक्षा भोकरे यांनी व्यक्त केली.
शिरोडी खुर्द हे गाव फुलशेती व्यवसायामध्ये अग्रेसर आहे, त्यामुळे गावातील अनेक शेतकरी फुलशेतीत आहेत. गतवर्षी या फुलशेतीमध्ये 100 क्विंटल उत्पादन आणि जवळपास 4 ते 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. सध्यातरी फुलांची स्थिती उच्च दर्जाची आहे. त्यानुसार यंदा देखील चांगले पैसे यामधून मिळतील. तसेच या शेतीसाठी 50 हजार रुपयांचा खर्च झालेला आहे. सर्व खर्च वजा करून अडीच ते तीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल, असे रवींद्र भोकरे यांनी सांगितले आहे.
advertisement
झेंडू शेती कशी करावी?
नवीन शेतकरी किंवा तरुणांना फुलशेतीमध्ये यायचे झाल्यास त्यांनी सुरुवातीच्या काळात म्हणजेच झेंडू झाडांची लागवड करताना मल्चिंग करणे महत्त्वाचे आहे. मल्चिंग केल्यामुळे वीस ते पंचवीस दिवस शिल्लक या झेंडू बागेतून उत्पादन घेता येते आणि यामुळे दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन जास्त निघते. झेंडूसाठी फवारणी आणि ड्रिप ॲप्लिकेशनचे योग्य नियोजन केले तर झेंडू हा लागवडीपासून चार महिने उत्पादन देऊ शकतो आणि झाडेही टिकू शकतात. या शेतीसाठी पेप्सी ठिबक आम्ही वापरला आहे. तसेच इतर शेतकऱ्यांनी देखील फुलशेती करायची झाल्यास मल्चिंगचा वापर आवश्यक करावा, असा सल्ला देखील भोकरे यांनी दिला आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 7:27 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : नेहमीच्या पिकांपेक्षा नवा प्रयोग, खर्चही आला कमी, आता वर्षाला 5 लाखांची कमाई फिक्स!







