T20 World Cup : 'ये किर्ती आझाद...', टीम इंडियाची लाज वाटते म्हणणाऱ्यावर इशान किशनचा पलटवार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहते जल्लोष करत आहेत, पण टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार किर्ती आझाद यांनी टीम इंडियावर निशाणा साधला.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहते जल्लोष करत आहेत, पण टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार किर्ती आझाद यांनी टीम इंडियावर निशाणा साधला आहे. वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह हे ट्रॉफी घेऊन अहमदाबादच्या हनुमान मंदिरात गेले, त्यावरून किर्ती आझाद यांनी टीका केली आहे. टीम इंडियाची लाज वाटते, अशी वादग्रस्त प्रतिक्रिया किर्ती आझाद यांनी दिली आहे.
काय म्हणाले किर्ती आझाद?
'टीम इंडियाची लाज वाटते. आम्ही कपिल देवच्या नेतृत्वात 1983 चा वर्ल्ड कप जिंकलो, तेव्हा आमच्या टीममध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन खेळाडू होते. विजयानंतर आम्ही ट्रॉफी आमच्या धार्मिक जन्मभूमीमध्ये भारत, हिंदूस्तानमध्ये आणली. भारताची ट्रॉफी यामध्ये का ओढली जात आहे? मशीद का नाही? चर्च का नाही? गुरूद्वारा का नाही? ही टीम भारताचं प्रतिनिधीत्व करते, सूर्यकुमार यादव किंवा जय शाह यांच्या कुटुंबाचं नाही. सिराजने कधी मशिदीमध्ये ट्रॉफी नेली नाही, किंवा संजूने चर्चमध्ये ट्रॉफी नेली नाही. संजूने या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि तो स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू होता. ही ट्रॉफी प्रत्येक धर्माच्या भारतीयाची आहे, एका धर्माची नाही', अशी पोस्ट किर्ती आझाद यांनी केली आहे.
advertisement
इशान किशनची प्रतिक्रिया
दरम्यान टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता खेळाडू इशान किशनला याबद्दल विचारण्यात आलं. 'एवढा चांगला वर्ल्ड कप जिंकला आहे, तर चांगला प्रश्न विचारा. किर्ती आझाद काय बोलले, त्यावर मी काय बोलू? चांगला प्रश्न विचारा, किती मजा आली? ते विचारा,' अशी प्रतिक्रिया इशान किशनने दिली आहे.
ईशान किशन पत्रकारों पर गुस्सा हो गये, जो लाजमी भी है
ईसान किशन ने कहा - "कुछ अच्छा सवाल कीजिए न" कीर्ति आजाद क्या बोलें, उस पर मे क्या बोलू pic.twitter.com/GTKWV1N75u
— ममता ट्राबल (@Mamtasulaniya) March 10, 2026
advertisement
हरभजनही संतापला
दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आप खासदार हरभजन सिंग यानेही किर्ती आझाद यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मंदिरात गेल्यामुळे कुणी राजकारण करत असेल, तर ते हास्यास्पद आहे. कुठे जाणं हा त्यांचा निर्णय आहे. या मुद्द्यावर राजकरण करू नये. माजी क्रिकेटपटूकडून अशा गोष्टी ऐकून खूप दु:ख होतं. देशाने वर्ल्ड कप जिंकला ही मोठी गोष्ट आहे. या मुद्द्यावर राजकरण होऊ नये, कुणी मंदिरात गेलं की मशिदीत. मार्ग एकच आहे. तो त्यांचा विश्वास आहे. कुणाच्याही श्रद्धेवर असे प्रश्न उपस्थित केले जाऊ नयेत', असं हरभजन सिंग म्हणाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 7:26 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : 'ये किर्ती आझाद...', टीम इंडियाची लाज वाटते म्हणणाऱ्यावर इशान किशनचा पलटवार!






