TRENDING:

निफाडमध्ये उपनगराध्यक्षाच्या शेतात अघोरी कृत्य, हिरव्या बांगड्या आणि धमकीची चिठ्ठी; गावात चर्चांना उधाण

Last Updated:

शेतामध्ये शेंदूर लावलेल्या बाहुल्या, टाचण्या टोचलेले लिंबू, नारळ, हिरव्या बांगड्या आणि धमकीची चिठ्ठी आढळून आल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : निफाड तालुक्यातील उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांच्या शेतात काळ्या जादूचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतामध्ये शेंदूर लावलेल्या बाहुल्या, टाचण्या टोचलेले लिंबू, नारळ, हिरव्या बांगड्या आणि धमकीची चिठ्ठी आढळून आल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे निफाड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
News18
News18
advertisement

घटनास्थळी आढळलेल्या प्रत्येक बाहुलीला स्वतंत्र चिठ्ठी बांधलेली होती. पहिल्या चिठ्ठीवर अनिल कुंदे, तर उर्वरित दोन चिठ्ठ्यांवर त्यांचे नातेवाईक उत्तम कुंदे आणि सुनील कुंदे अशी नावे लिहिलेली होती. तिन्ही चिठ्ठ्यांमध्ये आम्ही तुम्हाला ठार मारण्याची सुपारी घेतली आहे, असा धक्कादायक मजकूर असल्याने या प्रकाराला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. हा प्रकार काळी जादू किंवा अघोरी कृत्याशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

advertisement

पोलिसांची घटनास्थळी तात्काळ धाव

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सर्व संशयास्पद वस्तू ताब्यात घेऊन पंचनामा केला असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून नेमका हा प्रकार कोणी आणि कोणत्या हेतूने केला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध अंगांनी तपास केला जात आहे.

advertisement

राजकीय अस्तित्वाला पायबंद घालण्याचा किळसवाणा प्रकार

दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांनी सांगितले की, मी राजकीय आणि सामाजिक कार्यात सक्रिय असून माझ्या राजकीय अस्तित्वाला पायबंद घालण्यासाठीच हा किळसवाणा प्रकार करण्यात आला असावा. अशा घाणेरड्या प्रवृत्तीमुळे मी घाबरणार नाही. तसेच, कायद्यावर आणि पोलिस यंत्रणेवर आपला विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

advertisement

अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवण्याते आवाहन

या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. टी. आर. गोराणे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होऊन 13 वर्षे झाली असली तरी त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली तर अशा प्रकारच्या गुन्हेगारी आणि अंधश्रद्धेवर आधारित घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल. तसेच नागरिकांनी अशा अंधश्रद्धात्मक प्रकारांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

advertisement

निफाड तालुक्यात भीतीचे वातावरण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रथ सप्तमीच्या दिवशी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी आणि महत्व
सर्व पहा

या घटनेमुळे निफाड तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निफाडमध्ये उपनगराध्यक्षाच्या शेतात अघोरी कृत्य, हिरव्या बांगड्या आणि धमकीची चिठ्ठी; गावात चर्चांना उधाण
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल