TRENDING:

घटस्फोटीत, गर्भवती अन् विवाहित, कुणालाही सोडत नव्हता अशोक खरात, 3 FIR मधून सगळी विकृती समोर

Last Updated:

एका २८ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातची मागील चार दिवसांपासून कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीत अशोक खरातबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
एका २८ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. मागील चार दिवसांपासून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीत अशोक खरातबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्याचे अत्याचाराचे तब्बल १०० हून अधिक व्हिडीओज देखील समोर आले आहे. या व्हिडीओत त्याने अनेक उच्चशिक्षित, गरजू महिलांना भविष्य सांगण्याच्या नावाखाली अत्याचार केले आहेत. यानंतर आता रविवारी अशोक खरात विरोधात आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Ashok Kharat 58 abused video leak
Ashok Kharat 58 abused video leak
advertisement

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वासनांध भोंदूबाबा अशोक खरात याने आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या पत्नीला देखील आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित महिला सात महिन्यांची गर्भवती होती. बाळाचा जन्म सुरक्षित व्हावा, चांगली पुत्रप्राप्ती व्हावी, याच्या नावाखाली आरोपी अशोक खरातने गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार केले. घटनेच्या वेळी पीडितेचा पतीदेखील त्याच ठिकाणी होता. आरोपीनं विधी करण्याच्या बहाण्याने पतीला केबिनमधून बाहेर काढलं आणि त्याच्या गर्भवती पत्नीवर अत्याचार केला.

advertisement

तिसऱ्या प्रकरणात आरोपीनं एका घटस्फोटीत महिलेवर देखील अत्याचार केला आहे. आरोपीनं घटस्फोटीत महिलेला लग्नाचं आमिष दाखवून आणि आर्थिक लाभ देण्याचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला आहे. तसेच तिचं लग्न ठरलेल्या व्यक्तीसोबत आयुष्यात शुभ काळ येईल, असा विश्वास देत आरोपीनं विकृत प्रकार केला. एवढंच नव्हे यातून पीडित महिला गर्भवती झाल्यानंतर आरोपीनं तिचा गर्भपात करण्यासाठी औषध दिलं. तांत्रिक विधीसह अघोरी पूजाविधी करून मुलाचं बरं वाईट होईल, अशी धमकी देत तो पीडितेवर वारंवार अत्याचार करत होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: ऊन तापलं, मार्केट हाललं, लिंबू, केळीच्या आवकेत घट; द्राक्षे, कांद्याला कुठं मिळाला भाव?
सर्व पहा

मी एक अवतारी पुरुष आहे. मला त्रिकाळ ज्ञान आहे. तू मागील जन्मात अप्सरा होती, असं भासवत आरोपीनं तिला संमोहित केलं होतं. शिवाय तुझा घटस्पोट लिखित होता. मी तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या मुलांचा सांभाळ करतो असे सांगून आरोपीनं तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. आता या प्रकरणी पीडित महिलेनं सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी तिन्ही गुन्ह्यांच्या गांभीर्याने दखल घेतली असून घटनेचा तपास केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
घटस्फोटीत, गर्भवती अन् विवाहित, कुणालाही सोडत नव्हता अशोक खरात, 3 FIR मधून सगळी विकृती समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल